कडक सॅल्यूट! भरपावसात महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Inspector Rajeshwari

तामिळनाडूत गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

भरपावसात महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

चेन्नई : तामिळनाडूत गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नई येथील एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या महिला पोलिसानं मुसळधार पावसात येथील टीपी छत्रम भागातील स्मशानभूमीत बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचविला. यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. राजेश्वरी (Rajeshwari) असं या महिला पोलिसाचं नाव आहे. त्या पोलीस निरीक्षक (Police Inspector) पदावर कार्यरत आहेत.

हा व्हिडिओ IAS सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केलाय. इन्स्पेक्टर राजेश्वरी (Police Inspector Rajeshwari) यांच्यापेक्षा मजबूत खांदा कोणाचाही असू शकत नाही, असं त्यांनी ट्विट केलंय. मुसळधार पावसात त्यांनी एका बेशुद्ध व्यक्तीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेलं. राजेश्वरी यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेल्या व्यक्तीचं नाव उधाया असं आहे. राजेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्या चेन्नईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बाहेर गेल्या होत्या, तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. लोकांच्या मदतीनं त्यांनी त्याला उचललं आणि तातडीनं रुग्णालयात नेलं.

हेही वाचा: 2,348 प्रवासी गाढ झोपेत असताना रेल्वे रुळांवर कोसळले मोठे दगड

दरम्यान, वेळीच रुग्णालयात पोहोचल्यानं उधाया यांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश्वरी या चेन्नईतील टीपी चेतराम पोलिस स्टेशनमध्ये (TP Chatram Police Station) कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध व्यक्ती 28 वर्षांची होती. ती गुरुवारी स्मशानभूमीजवळ बेशुद्धावस्थेत पडली होती. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेय. सध्या चेन्नईतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. राज्यात शनिवारपासून पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय.

तामिळनाडूतील 20 जिल्ह्यांत 'रेड अलर्ट'

तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे हवामान खात्यानं 20 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. या जिल्ह्यांमध्ये चेन्नई, तिरुवल्लूर, रानीपेट, वेल्लोर, सलेम, कल्लाकुरिची, तिरुपत्तूर आणि तिरुवन्नमलई यांचा समावेश आहे. यापैकी एक किंवा दोन भागात 20.4 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर इतर भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूशिवाय आंध्र प्रदेश आणि पाॅंडेचारीमध्ये मुसळधारचा इशारा देण्यात आलाय.

पुरामुळे रस्ते जाम

चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे विजेच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने दक्षिण चेन्नईतील वीजपुरवठा खंडित झालाय, तर कोडमबक्कम आणि अशोक नगर भागात रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते ठप्प झाले आहेत.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

हवामान खात्याने पुढील दोन दिवस तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवलीय. त्यामुळं बुधवारी चेन्नई विमानतळावर येणारी सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

6 जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा

तामिळनाडूच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळं थुथुकुडी, विल्लीपुरम, तिरुनेलवेली, नागापट्टिनम, कुड्डालोर आणि चेंगलपेट्टू जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा जारी केलाय.

9 जिल्ह्यांतील शाळा बंद

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर, राज्य सरकारने चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेंगलपेट, कुड्डालोर, नागपट्टिनम, तंजावूर, तिरुवरूर आणि मयीलादुथुराई जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना 11 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली होती.

loading image
go to top