छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

नुकताच आलेल्या दीपिका पुदोकोनच्या चित्रपटातून अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल या तरुणीची संघर्ष कहाणी मांडली आहे. या चित्रपटापासून प्रेरित होऊन उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला असून अॅसिड हल्ला झालेल्या तरुणींसाठी मदत करण्याचे निश्चित करुन त्यांच्यासाठी पेन्शन योजना चालू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे

नवी दिल्ली : नुकताच आलेल्या दीपिका पुदोकोनच्या चित्रपटातून अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल या तरुणीची संघर्ष कहाणी मांडली आहे. या चित्रपटापासून प्रेरित होऊन उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला असून अॅसिड हल्ला झालेल्या तरुणींसाठी मदत करण्याचे निश्चित करुन त्यांच्यासाठी पेन्शन योजना चालू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्तराखंड राज्यात सध्या भाजपप्रणित सरकार सत्तेत आहे. राजकारण बाजूला ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे योजना?
उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या पेन्शन योजनेतून अॅसिड हल्ला झालेल्या महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी नोकरीची सोय करण्यात येणार आहे. तसेच समाजातून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांचे जिवनमान सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर, नोकरी अथवा अन्य कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध न झाल्यास सरकार त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करेल.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री रेखा आर्य यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की सरकार अॅसिड हल्यातील पिडीत महिलांसाठी ५०००-६००० रुपये पेन्शन देण्याचा विचार करत असून हे लवकरच अंमलात आणण्यात येईल अशी पुष्टीही त्यांनी दिली आहे. या पैशात पिडीत महिला आपले जीवन व्यवस्थितपणे जगू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhapaak Effect Uttarakhand To Give Pension To Acid Attack Survivors