भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेशातील आमदार विपिन सिंह यांनी दादागिरी केली असून त्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गोरखपूर : भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेशातील आमदार विपिन सिंह यांनी दादागिरी केली असून त्यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका किरकोळ प्रकरणावरून थेट शेजाऱ्याला मारहाण केली असल्याचा हा व्हिडिओ असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना लोक भाजपच्या ट्विटर अकाऊंटलादेखिल टॅग करत आहेत. रेणुका धायबर या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून BJP4India ट्विटर अकाऊंटला टॅग करण्यात आले आहे. तसेच भाजपचे आमदार विपिन सिंह यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद अशा आशयाचे कॅप्शनही देण्यात आले आहे.

तत्पूर्वी, शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीचा त्रास झाल्याने त्याला दादागिरी दाखवत विपिन सिंह यांनी मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली गेली असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla vipin singh arrogance caught in camera video Viral