

टेक्सास (अमेरिका): महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातासमुद्रापार अमेरिकेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ऑस्टिनच्या ‘महाराष्ट्र माझा’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.