Belgaum: शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी 7 जणांना अटक, 27 जणांवर कारवाई

मुख्यमंत्री बोम्मई; बेळगावात २७ जणांवर कारवाई
basavaraj bommai
basavaraj bommaisakal

बेळगाव : बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणांत तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी (ता.१९) हुबळीत (Hubali) दिली. तसेच बंगळूरातील घटनेचे पडसाद बेळगावात (Belguam)उमटले असून, २७ जणांना अटक झाल्याचे सांगितले.बंगळूरमधील शिवाजी महाराज आणि बेळगावातील संग्गोळी रायण्णा (Sangolli Rayanna) यांच्या मुर्तीची विटंबना झाल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले. बेळगाव शहरामध्ये निदर्शकांनी खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेवर दगडफेक करत हानी केली.

Summary

बंगळूरमधील शिवाजी महाराज आणि बेळगावातील संग्गोळी रायण्णा यांच्या मुर्तीची विटंबना झाल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले.

याबाबत मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले,‘छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, संग्गोळी रायण्णा देशभक्त होते. भाषा, जातीच्या पलिकडे जात काम केले. देशासाठी अतुलनीय योगदान दिले. समाज एकसंघ ठेवण्यासाठी काम केले. त्यांच्याबाबत भाषिक तेढ वा अपमान करणे योग्य नाही. गोंधळ मांजविणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई हाती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना केलेल्यांना अटक करण्यात आली असून, संग्गोळी रायण्णा यांच्या मुर्तींची विटंबना केलेल्यांना अटक करण्यात आली आहे. बंगळूर घटनेत तिघांना अटक झाली आहे. तर बेळगावातील घटनेत २७ जणांवर अटक कारवाई झाली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. पाळेमुळे खणून काढली जात आहेत.’’

कर्नाटक (Karnatka )आणि महाराष्ट्रातील (Maharashtra)विविध राज्यात मागील दोन दिवसांपासून तणावस्थिती आहे. विविध ठिकाणी समाजकंटक विरोधात कारवाई संदर्भात आंदोलन सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र पाठविल्याची माहिती आहे, असा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्याची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. यामुळे माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असे उत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com