
Crime : दुकानातील कामगार मुलीवर लग्नासाठी दबाव; नकार देताच वयस्क व्यक्तीने केलं अस काही की...
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका ४७ वर्षीय व्यक्तीने तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या हातात धारदार शस्त्रही दिसत आहे. तसेच पीडितेच्या पाठीवर जखमा आणि रक्ताच्या अनेक खुणा दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपी पीडितेच्या केसाला पकडून फरफटत नेताना दिसत होता. या घटनेत पीडितेच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणाही दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी आणि पीडितेची ओळख पटली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपूरचे एसएसपी प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपी ओमकार तिवारी उर्फ मनोज (वय 47) याच्या दुकानात काम करत होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.