Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE counting: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

भूपेश बघेलांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपचं केलं अभिनंदन

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यापार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी विजय भाजपचं अभिनंदन केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-54

  • काँग्रेस-35

  • इतर-1

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

रात्री 11:00 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत; सरकार स्थापनेचा दावा करणार

राज्यात ८३ जागांवरील निकाल स्पष्ट झाले असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपचा ४९ जागांवर विजय झालाय, तर काँग्रेसचा ३३ जागांवर यश मिळालंय. गोंडवणा गणतंत्र पक्षाला एक जागा मिळवता आली आहे. आणखी सात जागांवरील मतमोजणी सुरु आहे. बहुमतासाठी ४६ चा आकडा आवश्यक होता, तो भाजपने गाठला आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: गोंढवणा गणतंत्र पक्षाचा एका उमेदवार विजयी

गोंढवणा गणतंत्र पक्षाचा एका उमेदवार विजयी झाला आहे. पाली-टनखार मतदारसंघातून गोंढवणा गणतंत्रचा उमेदवार विजयी झालाय.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक बैस यांचा पराभव

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार दीपक बैस यांचा चित्रकोट मतदारसंघात पराभव झालाय. त्यांना भाजपच्या विनायक गोयल यांनी ८३७० मतांनी पराभव केला आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजपला स्पष्ट बहुमत

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-55

  • काँग्रेस-35

  • इतर-0

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

रात्री 08:00 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भूपेश बघेल पाटन मतदारसंघातून विजयाच्या उंबरठ्यावर

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाटन मतदारसंघ जवळ ठेवण्यात यश आलं आहे. त्यांनी भाच्चा आणि भाजप नेते विजय बघेल यांचा पराभव केला आहे. याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजपला स्पष्ट बहुमत; काँग्रेसच्या पदरी निराशा

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-54

  • काँग्रेस-36

  • इतर-0

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

सायंकाळी 07:00 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: निवडणूक आयोगाकडून १३ जागांचे अंतिम निकाल जाहीर

निवडणूक आयोगाने छत्तीसगडमधील १३ जागांचे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. यात भाजपला ८ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या ७७ जागांवर भाजप ४९ तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमधील बहुमतानंतर अमित शाह यांच्याकडून ट्वीट

अमित शाह यांच्याकडून छत्तीसगड विजयानंतर ट्वीट करण्यात आलं आहे. राज्यातील गरीब जनता, शेतकरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवून प्रचंड बहुमताने विजयी केलं आहे. या विशाल विजयासाठी मी छत्तीसगडच्या जनतेचे आभार मानतो. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असं ते म्हणाले.

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  भाजपची मुसंडी सुरुच, 57  जागांवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-57

  • काँग्रेस-33

  • इतर-2

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

सांयकाळी 05:00 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भूपेश बघेल यांना पाटनमधून 13,989 मतांची आघाडी; विजय बघेलांना टाकले मागे

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पाटन मतदारसंघातून 13,989 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना एकूण 71,077 मते मिळाली आहे तर प्रतिस्पर्धी विजय बघेल यांना 57,088 मते मिळाली आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  गृहराज्यमंत्री ताम्रध्वज साहू 11 हजार मतांनी मागे

दुर्ग ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर राज्याचे गृहराज्यमंत्री ताम्रध्वज साहू 11 हजार 725 मतांनी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत ताम्रध्वज साहू यांना 33066 तर भाजपचे ललित चंद्राकर यांना 43686 मते मिळाली आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-53

  • काँग्रेस-35

  • इतर-2

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

दुपारी 3.25 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये भाजप विजयाच्या मार्गावर, प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

छत्तीसगडमधील निवडणूक निकालांवर भाजप खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अरुण साओ म्हणाले की, छत्तीसगडमध्ये जो कोणी जनतेच्या कष्टाने कमावलेला पैसा लुटतो त्याला तुरुंगात पाठवले जाईल. काहीही झाले तरी कोणालाही सोडले जाणार नाही.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण होणार हे हायकमांड ठरवेल- रमण सिंह

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सांगितले की, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे आमदार आणि हायकमांड ठरवतील. पीएम मोदींचे नाव आणि त्यांच्या कार्यामुळे हा विजय मिळाला असल्याचे ते म्हणाले.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजप 54 जागांवर तर काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-54

  • काँग्रेस-33

  • इतर-3

एकूण जागा- 90

बहुमताचा आकडा- 46

दुपारी 2.40 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: मुख्यमंत्री भूपेश बघेल 10 हजार मतांनी पुढे

दुर्ग जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात 11व्या फेरीत मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस) यांना 58974 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार आणि दुर्गचे खासदार विजय बघेल यांना 48962 मते मिळाली. मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या 10 हजार 12 मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भूपेश बघेल पाटनमधून आघाडीवर, रमण सिंह राजनादगांवमधून विजयी

पाटन विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आघाडी घेतली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपचे विजय बघेल सध्या पिछाडीवर आहेत. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे राजनादगांव मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजपची आगेकुच सुरुच; स्पष्ट बहुमत गाठले!

निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-55

  • काँग्रेस-32

  • इतर-3

एकूण जागा: 90

बहुमत: 46

दुपारी 2 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  काँग्रेसची पिछेहाट

निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल-2023

  • भाजप-53

  • काँग्रेस-34

  • इतर-3

एकूण जागा: 90

बहुमत: 46

दुपारी 1 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  जाणून घ्या छत्तीसगडच्या महत्त्वाच्या जागांची स्थिती

  • जगदलपूर विधानसभेतून भाजपचे किरण देव 8 फेऱ्यांमध्ये 15 हजार 707 मतांनी पुढे आहेत.

  • चित्रकोट विधानसभेच्या 8व्या फेरीत भाजपचे विनायक गोयल 7433 मतांनी आघाडीवर आहेत.

  • कोंटा विधानसभेच्या 15 व्या फेरीत काँग्रेसच्या कावासी लखमा एकूण 1271 मतांनी पुढे आहेत.

  • केशकल विधानसभेत भाजपचे उमेदवार नीलकंठ टेकम 7183 मतांनी पुढे आहेत.

  • कांकेर विधानसभेत भाजपचे आसाराम नेताम 4545 मतांनी पुढे आहेत.

  • अंतागड विधानसभेत भाजपचे उमेदवार विक्रम उसेंडी 20 हजार मतांनी पुढे आहेत.

  • विजापूर विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार विक्रम मांडवी 4595 मतांनी पुढे आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: मोदींच्या नावावर आणि कामावर मते मिळाली : रमण सिंह

जनतेने भाजपला आशीर्वाद दिल्याचे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी म्हटले आहे. जनतेने मोदींवर विश्वास ठेवला. मोदींच्या नावावर कामावर मतदान केले.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काय आहे निवडणूक आयोगाचा कल?

निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, छत्तीसगड विधानसभा निकाल 2023-

  • भाजप-53

  • काँग्रेस-36

  • इतर-1

एकूण जागा: 90

बहुमत : 46

दुपारी 12.40 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये भाजप 53 जागांवर आघाडीवर

छत्तीसगडमधील 90 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. एका जागेवर इतरांची आघाडी आहे. त्यामुळे भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा पुढे

पाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा 1452 मतांनी आघाडीवर आहेत. तर राजनाडगावमधून भाजप नेते डॉ. रमण सिंह 17541 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या एकूण 16 फेऱ्या होत असून त्यापैकी 5 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव पिछाडीवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव छत्तीसगडमधील अंबिकापूर मतदारसंघातून -366 मतांनी पिछाडीवर आहेत. येथे भाजपचे राजेश अग्रवाल पुढे आहेत. सुरगुजामध्ये भाजपचे उमेदवार रामकुमार टोप्पो हे 3 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भाजप 55 जागांवर तर काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजप पाच जागांवर 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर

छत्तीसगडमध्ये अशा काही जागा आहेत जिथे भाजप अजूनही 500 पेक्षा कमी मतांनी पुढे आहे, ज्यात कुर्द मतदारसंघातून भाजपला 278 मते, पाटणमधून विजय बघेल यांना 407 मते, कोंडागावमधून लता उसेंडी यांना 74 मते, चित्रकूटमधून विनायक गोयल यांना 262 मते आहेत. भरतपूर सोनहाटमध्ये 262 मते असून रेणुका सिंह 307 मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत

छत्तीसगड विधानसभा निकाल- 2023

  • भाजप-50

  • काँग्रेस-38

  • इतर-2

एकूण जागा: 90

बहुमत: 46

सकाळी 11.50 पर्यंतचे आकडे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडमध्ये

छत्तीसगडमध्ये निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक मोठे चेहरे मागे पडले आहेत.

विधानसभा मतदारसंघ 62 - पाटण (छत्तीसगड)

  • मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस) 400 हून अधिक मतांनी मागे आहेत.

  • विजय बघेल (भाजप) 407 मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत

छत्तीसगड विधानसभा निकाल- 2023

  • भाजप-48

  • काँग्रेस-38

  • इतर-1

एकूण जागा: 90

बहुमत: 46

Chhattisgarh Assembly Election result LIVE: पंतप्रधान मोदींवर जनतेला विश्वास - रमण सिंह

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी आजचा दिवस छत्तीसगडसाठी अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. आपले सरकार स्थापन होणार आहे हे मला आधीच माहीत होते. येथे भाजपच पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास आहे. भूपेश बघेल यांना राज्यातील जनतेने नाकारले आहे. भूपेश बघेल सरकारमध्ये भ्रष्टाचार होता.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये मोठी उलथापालथ

छत्तीसगड विधानसभा निकाल- 2023

  • भाजप-50

  • काँग्रेस-38

  • इतर-2

एकूण जागा : 90

बहुमत : 46

11.15 वाजेपर्यंतची आकडेवारी

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये भाजपने केला सरकार स्थापन करण्याचा दावा

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये झालेल्या वाढीमुळे भाजपने छत्तीसगडमध्ये विजय मिळवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भाजपने आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट केले आणि लिहिले, "भाजपने छत्तीसगडला नवसंजीवनी दिली आहे, देशात पुन्हा एकदा भाजपचे मोदी सरकार स्थापन होईल.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजपने गाठला बहुमताचा आकडा

छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या भाजप 49, काँग्रेस 39 आणि इतर दोन जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: रायपूरमध्ये भाजप 7 जागांवर पुढे

मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत रायपूरमध्ये भाजप 7 जागांवर पुढे

  • रायपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ब्रिजमोहन यांना 10063 आणि काँग्रेसला 4739 मते मिळाली.

  • रायपूर ग्रामीण विधानसभेतून भाजपचे मोतीलाल साहू यांना 9925 मते मिळाली, काँग्रेसचे पंकज शर्मा यांना 5903 मते मिळाली.

  • आरंग विधानसभेत भाजपचे खुशवंत यांना 11033 तर काँग्रेसला 11033 मते मिळाली

  • रायपूर उत्तर विधानसभेतून भाजपचे पुरंदर मिश्रा यांना 688 तर काँग्रेसचे कुलदीपला 3701 मते

  • रायपूर पश्चिम विधानसभेतून भाजपचे राजेश मुनत यांना 10038 आणि काँग्रेसला 10038 मते मिळाली

  • अभानपूर विधानसभेतून भाजपचे इंदर कुमार यांना 11213 अधिक मते मिळाली तर काँग्रेसचे धनेंद्र साहू यांना 9443 मते

  • धरसिवा विधानसभेतून भाजपच्या अनुज यांना 10600 तर काँग्रेसच्या छाया वर्मा यांना 7536 मते मिळाली.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: आकडे सतत बदलत असतात

छत्तीसगडमध्ये येत असलेल्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा भाजप 45 जागांवर तर काँग्रेस 43 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: कांकेर मतदारसंघातून भाजप 83 मतांनी आघाडीवर आहे

कांकेर मतदारसंघातून भाजपचे आशाराम नेताम अवघ्या 83 मतांनी आघाडीवर आहेत. तर अंतागडमध्ये भाजपचे विक्रम उसेंडी 427 मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काँग्रेस दोन जागांवर पुढे

जगदलपूर विधानसभा

  • भाजप: 6904

  • काँग्रेस : 3939

  • भाजप पुढे

चित्रकोट विधानसभा

  • भाजप: 2968

  • काँग्रेस : 3167

  • काँग्रेस पुढे

बस्तर विधानसभा

  • भाजप : 3550

  • काँग्रेस: ​​3595

  • काँग्रेस पुढे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: कुठे काँग्रेस पुढे आहे तर कुठे भाजप पुढे

महासमुंद विधानसभा जागा

  • भाजप - 2723

  • काँग्रेस – ४५५१

  • एकूण - 7967

  • काँग्रेस पुढे - 1828 मतांनी

खल्लारी विधानसभा जागा

  • भाजप - 3409

  • काँग्रेस - 4310

  • एकूण – 8082

  • काँग्रेस 901 मतांनी पुढे

बसना विधानसभा जागा

  • भाजप - 5228

  • काँग्रेस – ३९४२

  • एकूण - 9489

  • भाजप 1286 मतांनी पुढे

सरायपाली विधानसभा

  • भाजप - 1766

  • काँग्रेस – ५०७४

  • एकूण – 7318

  • काँग्रेस 3308 मतांनी पुढे

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काँग्रेसला पुन्हा बहुमत

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. काँग्रेस सध्या 46 जागांवर पुढे आहे म्हणजेच बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी दोन जागांवर आघाडी आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये 7 मंत्री पिछाडीवर

  • मंत्री ताम्रध्वज साहू

  • मंत्री मोहन मरकम

  • मंत्री कावसी लखमा

  • मंत्री मोहम्मद अकबर

  • मंत्री अमरजीत भगत

  • मंत्री रुद्र गुरु

  • मंत्री अनिला भेडिया

Chhattisgarh Assembly Election result LIVE: भाजपचे महत्त्वाचे नेते आघाडीवर

  • भाजप जरी आकड्यांमध्ये पिछाडीवर असली तरी अनेक महत्त्वाचे नेते आघाडीवर

  • काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते पिछाडीवर

  • मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण विधानसभा मतदार संघात पिछाडीवर

  • गृहमंत्री ताम्रध्वज साहू, विधानसभा अध्यक्ष चरण दास महंत हे देखील पिछाडीवर

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा पुढे; काय आहेत आकडे?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेस मागे दिसत आहे. काँग्रेस सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: निवडणूक आयोगाच्या मते, छत्तीसगडमध्ये कोण पुढे?

छत्तीसगडमध्ये निवडणूक आयोगानुसार काँग्रेस 15 जागांवर तर भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत एकूण 28 जागांचे ट्रेंड आले आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू मागे

छत्तीसगडमध्ये दुर्ग ग्रामीण विधानसभेतून गृहमंत्री ताम्रध्वज साहू 1365 मतांनी पिछाडीवर आहेत. गृहराज्यमंत्री ताम्रध्वज साहू यांना 3938 तर भाजपचे उमेदवार ललित चंद्राकर यांना 5303 मते मिळाली.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमधील सर्व जागांचे कल आले 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सर्व 90 जागांचे कल उघड झाले आहेत. यापैकी भाजप 44 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आणखी एक जागा पुढे आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: 'या' जागांवर भाजपने घेतली आघाडी

छत्तीसगडमध्ये ज्या जागांवर भाजप आघाडीवर आहे त्यामध्ये भरतपूर सोनहट, प्रतापपूर, रामानुजगंज, सामरी, लुंध्रा, प्रेमनगर, बैकुंठपूर, महेंद्रगढ, काठघोरा, मस्तुरी, पामगढ, बिल्हा, लोर्मी, पंडारिया, साजा, अरंग, रायपूर ग्रामीण, पटरीया, अरंग, रायपूर ग्रामीण संजरी बालोद, सिहावा, कल्लारी आणि जगदलपूर.

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  छत्तीसगडमध्ये कोण कुठे?

रायपूर पश्चिममधून भाजपचे राजेश मुनत 1039 मतांन पुढे, रायपूर दक्षिणमधून ब्रिजमोहन अग्रवाल 1500 मतांनी पुढे, लुंद्रा विधानसभेतून प्रबोध मिंज 2882 मतांनी पुढे, अंबिकापूरमधून टीएस सिंगदेव 650 मतांनी पुढे आहेत.

अमरजीत भगत हे एस. 585 मतांनी पुढे, कोरबा विधानसभेतून पहिल्या फेरीनंतर, कोरबा आमदार आणि महसूल मंत्री जयसिंग अग्रवाल 900 मतांनी मागे, भाजपचे उमेदवार लखन लाल दिवांगन पुढे, बिलासपूरमध्ये माजी मंत्री अमर अग्रवाल बिलासपूर विधानसभेत 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काँग्रेसला बहुमत मिळेल: टीएस सिंह देव

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते टीएस सिंह देव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्लॅन बी ची गरज नाही, काँग्रेसला बहुमत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Chhattisgarh Assembly Election Voting Result: छत्तीसगडमध्ये काँग्रेस 45 जागांवर पुढे

छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा एकदा मागे पडला आहे. आतापर्यंत एकूण 78 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. यापैकी भाजप 32 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election Voting Result: रमण सिंह आणि भूपेश बघेल मागे

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आपापल्या जागेवर पिछाडीवर आहेत. ट्रेंडनुसार, सध्या काँग्रेसला बहुमत मिळाले असून ते 46 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election Voting Result: छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला टाकले मागे

छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा एकदा आघाडीवर आहे. आतापर्यंत एकूण 76 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. यापैकी भाजप 38 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आणखी एक जागा पुढे आहे.

Chhattisgarh Assembly Election Voting Result: राजनांदगावात कोण पुढे-कोण मागे?

छत्तीसगड निवडणुकीचे निकाल: सुरुवातीचे ट्रेंड

  • राजनांदगावमधून भाजपचे डॉ. रमन सिंह पुढे

  • डोंगरगावमधून काँग्रेसचे दलेश्वर साहू पुढे

  • खुज्जीतून अपक्ष ललिता कंवर पुढे

  • डोंगरगडमधून काँग्रेसच्या हर्षिता पुढे

Chhattisgarh Assembly Election Voting Result: छत्तीसगडमध्ये भाजप मागे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत 71 जागांचे ट्रेंड आले आहेत. काँग्रेस आता 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 25 जागांवर पुढे आहे.

Chhattisgarh Assembly Election Voting Result: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे बहुमत

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सध्या 46 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: पाटणचे भूपेश बघेल, राजनांदगावचे रमण सिंग पुढे

ट्रेंडमध्ये अंबिकापूरचे टीएस सिंगदेव, पाटणचे भूपेश बघेल, राजनांदगावचे रमण सिंग पुढे आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE:  छत्तीसगडमध्ये 70 जागांचे ट्रेंड आले

छत्तीसगड निवडणूक निकालः छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 70 जागांचे ट्रेंड आले आहेत. काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 30 जागांवर पुढे आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे टीएस सिंहदेव पुढे

छत्तीसगड निवडणूक निकालः छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडमध्ये अंबिकापूरमधून काँग्रेसचे टीएस सिंहदेव आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार येथे मागे पडले आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: सुरुवातीचा कल काय सांगतो?

छत्तीसगड निवडणूक निकालः सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. खरसियामधून उमेश पटेल आघाडीवर आहेत. काँग्रेस 36 जागांवर तर भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: काँग्रेस आता 36 जागांवर पुढे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आता 36 जागांवर पुढे आहे. तर भाजप 32 जागांवर पुढे आहे. आतापर्यंत एकूण 68 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत.

Chhattisgarh Assembly Election result LIVE: छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा आघाडीवर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आता पुढे आहे. भाजप 30 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत एकूण 65 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत.

Chhattisgarh Assembly Election live update: पाटणमधून भूपेश बघेल पुढे 

छत्तीसगड निवडणूक निकालः पाटणमधून भूपेश बघेल पुढे, मुंगेलीतून पुन्नूलाल मोहले पुढे, अमर अग्रवाल बिलासपूरमधून पुढे, अरुण व्होरा दुर्गमधून पुढे, अमर अग्रवाल बिलासपूरमधून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत.

Chhattisgarh Assembly Election live update:  दुर्गमध्ये पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी सुरू

छत्तीसगड निवडणुकीचा निकाल: दुर्ग जिल्ह्यातही पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण 7775 पोस्टल मतपत्रिका जमा झाल्या आहेत. पोस्टल बॅलेटमध्ये सरकारी कर्मचारी, 80 वर्षांवरील आणि अपंगांचा समावेश आहे. एकूण 6 विधानसभांसाठी पोस्टल बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला आहे. अहिवरा विधानसभेतून सर्वात कमी 932 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या.

  • पाटण येथून : 1093

  • दुर्ग ग्रामीण : 1411

  • फोर्ट सिटी : 2260

  • भिलाई नगर येथून : 950

  • वैशाली नगरमधील : 1129 चा समावेश आहे

Chhattisgarh Assembly Election live update: काँग्रेस पक्ष घाबरलेला: अरुण साओ

छत्तीसगड भाजपचे अध्यक्ष अरुण साओ यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष घाबरलेला आहे. काँग्रेस जेव्हा हरते तेव्हा आरोप करते. कधी ते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करतात, कधी राज्यघटना बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी आणखी काही बोलतात. यावरून काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभव होणार आहे. खरे तर छत्तीसगडच्या जनतेने त्यांना नाकारले आहे.

Chhattisgarh Assembly Election live update: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह पुढे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह आघाडीवर आहेत. त्याचबरोबर भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगडमध्ये काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड वेगाने येत आहेत. काँग्रेस आता 30 जागांवर पुढे आहे. तर भाजप 25 जागांवर पुढे आहे. आतापर्यंत एकूण 55 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: भाजप लवकरच येणार आहे : भाजप नेते रमण सिंह

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी सोशल मीडिया साइट X वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "अंधार संपला आहे, सूर्य उगवला आहे, कमळ फुलणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी या मतमोजणी प्रक्रियेशी जोडले पाहिजे कारण भाजप लवकरच येणार आहे."

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगडमध्ये भाजप मागे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड वेगाने येत आहेत. काँग्रेस आता 23 जागांवर पुढे आहे. तर भाजप 17 जागांवर पुढे आहे. आतापर्यंत एकूण 40 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी 17-17 जागांवर आघाडी घेतली आहे.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: काँग्रेसचा दावा, आमचे सरकार पूर्ण ताकदीने स्थापन होईल

निवडणुकीच्या निकालावर छत्तीसगडचे मंत्री आणि काँग्रेस नेते ताम्रध्वज साहू म्हणाले की, आम्ही 75 चा आकडा ओलांडण्याचा नारा देत राज्यात काम केले आहे, त्यामुळे आम्ही 75 पार करू आणि येथे आमचे सरकार पूर्ण ताकदीने स्थापन होईल.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: मतमोजणीबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल काय म्हणाले?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे की, आज आदेशाचा दिवस आहे. जनता जनार्दनला सलाम. सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: काँग्रेस 14 जागांवर तर भाजप 8 जागांवर आघाडीवर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील 22 जागांचे कल उघड झाले आहेत. काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: 2018 च्या तुलनेत यावेळी मतदान कमी झाले

यावेळी छत्तीसगडमध्ये 76.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 76.88 टक्के मतदान झाले होते.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगडमध्ये काँग्रेस तीन जागांवर तर भाजप एका जागेवर पुढे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत चार जागांचे ट्रेंड आले आहेत. काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. भाजप एका जागेवर पुढे आहे.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू, काँग्रेस पुढे

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू, काँग्रेस पुढे

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगडमध्ये गुलाल कोणाचा? सकाळी 8 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात 

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक 2023 च्या मतमोजणीला काही वेळात सुरूवात होणार आहे. छत्तीसगड राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी मतमोजणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरगुजा येथील स्ट्राँग रूमचे कुलूप उघडण्यात आले. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE:

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात मतदान पार पडले. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपत आहे.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 90 जागा आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता असते. यावेळी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 20 नक्षलग्रस्त जागांवर 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर 17 नोव्हेंबर रोजी उर्वरित 70 विधानसभा जागांवर मतदान झाले होते.

गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2018 मध्ये झाल्या होत्या आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com