

Security forces in Bijapur during the mass surrender of 41 Naxal members, including 33 with high bounties.
esakal
41 Naxal members surrendered in Bijapur; 33 carried major bounties : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. बुधवारी एकूण ४१ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी ३२ जणांच्या डोक्यावर मोठे इनाम होते. ज्याची एकूण अंदाजे किंमत १ कोटी १९ लाख रुपये आहे.
एवढच नाहीतर आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे इनाम असलेले अनेक उच्च आणि मध्यम दर्जाचे नक्षलवादी आहेत. तर यामधील नऊ नक्षलवाद्यांना प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस आहे. तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी पाच लाखांचा इनाम आहे. तसेच, १२ नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २ लाख रुपये तर आठ नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे इम आहेत.
हे आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समिती, तेलंगणा राज्य समिती आणि धमतरी-गरियाबंद-नुआपड विभाग यासारख्या प्रमुख नक्षलवादी संघटनांशी संबंधित होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी भारतीय संविधानावर विश्वास व्यक्त केला आणि लोकशाही व्यवस्थेखाली सन्माननीय आणि सुरक्षित जीवन जगण्याची प्रतिज्ञा केली.
याशिवाय, प्रत्येक आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला त्वरित ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून मिळतील. त्यांना मुख्य प्रवाहातील समाजात परतण्यास मदत करण्यासाठी पुनर्वसन योजनांचा देखील लाभ मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.