Chhattisgarh SI Arrested in ACB Trap
esakal
Chhattisgarh SI Arrested in ACB Trap : छत्तीसगडमध्ये लाचखोरीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या असून, एका पोलिस उपनिरीक्षकाला (एसआय) आणि एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. दोन्ही प्रकरणांचे व्हिडिओही समोर आले असून त्यात आरोपी अधिकाऱ्यांनी पैशांच्या मागणीबाबत पुरावे मागत बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.