Crime News: आरोग्य केंद्रात नर्सचे हातपाय बांधून सामूहिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: आरोग्य केंद्रात नर्सचे हातपाय बांधून सामूहिक अत्याचार

रायपूरः छत्तीसगडमधल्या मनेंद्रगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चिरमिरी येथील आरोग्यकेंद्रात घुसून चौघांनी नर्सवर अत्याचार केला. पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेने छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आरोग्य केंद्रात एकटी असतांना दुपारच्या दरम्यान चार आरोपी आत घुसले. त्यांनी पीडितेचा गळा दाबला. त्यानंतर तिला बांधून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने घरी जावून आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जावून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना ताब्यात घेतलं. या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन आहे.

घटनेबाबत डीएसपी नमेश बारिया यांनी सांगितलं की, या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून एका आरोपीचा पोलिस शोध घेतल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची दोन पथकं रवाना झाल्याचं बारिया यांनी सांगितलं.

दरम्यान, घटनेनंतर पोलिस ठाण्यात भाजप नेते पोहोचले. त्यांना सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी या घटनेचा व्हीडिओदेखील बनवला आहे. या गंभीर प्रकारामुळे भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

टॅग्स :Chhattisgarhcrime