

Bijapur Naxalist Encounter
ESakal
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील दोन आणि सुकमा जिल्ह्यातील १२ मृतदेहांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणांवरून AK-47, INSAS आणि SLR रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत. यामुळे नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या कटाला उधळून लावण्यात आल्याचे मानले जात होते.