Woman Arrested for Assaulting Minor Boy
esakal
कवर्धा (छत्तीसगड): सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुले कशा प्रकारे गुन्हेगारी जाळ्यात ओढली जात आहेत, याचे एक विदारक उदाहरण छत्तीसगडमधील कवर्धा येथे समोर (Minor Boy Assaulted) आले आहे. एका २६ वर्षीय विवाहित महिलेने १६ वर्षीय मुलाशी सोशल मीडियावर ओळख वाढवून, त्याला हॉटेलवर बोलावले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.