
या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवून एकाच मंडपात चंदूशी लग्न केलं.
छत्तीसगढ : आजवर तुम्ही एखाद्याने दोन लग्नं केल्याची घटना नेहमीच ऐकली असेल. मात्र, एकाच व्यक्तीने एकाच मांडवात दोन महिलांशी लग्न केल्याची घटना आपल्यासाठी निश्चितच नवीन असेल. छत्तीसगढमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने दोन मुलींसोबत एकाच वेळी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. त्याने हे लग्न काही लपून-छपून केलं नाहीये तर दिवसाढवळ्या सगळ्या गावासमोर हे लग्न पार पडले आहे. सामान्यत: याप्रकारे दोन लग्न करण्याची घटना असामान्य असते. मात्र, हे तिघांचंही लग्न तिंघांच्याही सहमतीने झाल्याची ही घटना दुर्मिळ आहे.
Chhattisgarh: A man married two women at the same time in Bastar on January 3
"I married both of the women with their consent. The ceremony took place in front of all the villagers," he said. (07.01) pic.twitter.com/gd0SsAM1Lo
— ANI (@ANI) January 8, 2021
हसीना आणि सुंदरी असं या दोन मुलींची नावे आहेत. या दोघींनाही नवरदेव चंदू मौर्य आवडायचा. आणि म्हणून या दोघींनी जरा समजूतदारपणा दाखवून एकाच मंडपात चंदूशी लग्न केलं. यावेळी चंदूने म्हटलं की, मला त्या दोघीही आवडतात. तसेच त्या दोघींनाही मी आवडतो. हे लग्न आम्ही गाववाल्यांच्या समोर आणि सहमतीने केलं आहे. मात्र, या लग्नात माझ्या एका पत्नीच्या घरचे सदस्य या विवाहात सामिल झाले नाहीयेत. या लग्नामधील सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे लग्न संपूर्ण गावासमोर पार पडले तसेच कुणीही या लग्नाला विरोध दर्शवला नाही.
हेही वाचा - शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे बर्ड फ्लू पसरवण्याचा कट; भाजपचा आमदार बरळला
हसीना ही 19 वर्षीय आहे तर सुंदरी ही 21 वर्षांची आहे. दोघींनीही 12 वीची परिक्षा दिली आहे. त्यांच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. बस्तर जिल्ह्यातील हे पहिलेच उदाहरण आहे जिथे सगळ्या गाववाल्यांच्या समोर याप्रकारचे लग्न पार पडले आहे. ते ही मोठ्या थाटामाटात. याप्रकारचा विवाह हिंदू विवाह अधिनियमांमधील एक अपराध आहे. याविरोधात अद्यापतरी कोणतीही तक्रार दाखल झाली नाहीये.