

Chhattisgarh
sakal
जगदलपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद शेवटची घटका मोजत असून गेल्या दोन वर्षांत दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, असे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शनिवारी सांगितले. सरकारच्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे राज्यात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्याचा त्यांनी दावा केला.