
रायपूर विमानतळावर एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.
रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळलं, दोन्ही पायलट ठार
रायपूर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर विमानतळावर (Raipur Airport) एका हेलिकॉप्टरचा अपघात झालाय. एएनआयच्या वृत्तानुसार, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट ईपी श्रीवास्तव आणि कॅप्टन पांडा हे हेलिकॉप्टरमध्ये होते.
सरावाच्या वेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. हे हेलिकॉप्टर रायपूर राज्य सरकारचं असल्याचं सांगितलं जातंय. या दुर्घटनेत दोन पायलटांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. ही घटना रात्री ९.१० च्या सुमारास रायपूर विमानतळावर घडलीय.
हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय शेतकरी जगाला मदत करतोय : कृषी मंत्री
दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनानंही दोघांच्या मृत्यूची पुष्टी केलीय. दोघांनाही आता आयसीयूमधून बाहेर काढलं जात असून मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवलं जाणार आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचं पूर्णपणे नुकसान झालं असून, त्याच्या पंखाचा काही भाग निखळला आहे. मात्र, अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीय.
Web Title: Chhattisgarh News Helicopter Crash At Raipur Airport In Chhattisgarh 2 Pilots Dead
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..