esakal | छत्तीसगढमध्येही काँग्रेसचं सरकार डळमळीत, 15 आमदार दिल्लीत | Chhattisgarh Political Crisis
sakal

बोलून बातमी शोधा

Bhupesh Baghel

छत्तीसगढमध्येही काँग्रेसचं सरकार डळमळीत, 15 आमदार दिल्लीत

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Chhattisgarh Political Crisis : काँग्रेस पक्षाची पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यात सत्ता आहे. ती सरकारे सांभाळणे पक्षाला दुरापास्त होऊन बसल्याचं चित्र आहे. राजस्थान आणि पंजाबनंतर आता छत्तीसगढमधील काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. छत्तीसगढमधीस काँग्रेसचं सरकार डळमळीत झाल्याचं चित्र राजकीय वातावरण तयार झालं आहे. छत्तीसगढमधील काँग्रेसचे नाराज 15 आमदार राजधानी दिल्लीमध्ये पोहचले आहेत. राज्यातील सरकारच्या कारभारावर दिल्लीदरबारी दाद मागण्यासाठी राजधानीत पोहचल्याची चर्चा सुरु आहे. आमदारांच्या दिल्ली दौऱ्याबाबात मंत्री टीएस सिंगदेव म्हणाले की, 'छत्तीसगढमधील राजकीय वातावरणात काय चर्चा चालू आहे, याबाबत मला सर्वकाही माहिती आहे. सरकारमधील फेरबदलाबद्दल दिल्लीवारी असेल तर तो होणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मात्र, आमदारांमधील नाराजी समोर आली आहे.'

सिंगदेव म्हणाले की, ''गेल्यावेळी आमदार दिल्लीला गेले होते, तेव्हा पक्षातील नाराजी समोर आली होती. सरकारमधील फेरबदलाचे संकेत मिळाले होते. आताही ते त्यासाठी दिल्लीला गेलेले असू शकतात. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांसमोर ते आपली बाजू मांडतील.'' दरम्यान, टी.एस.सिंगदेव हे एक मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सिंगदेव यांनी धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा कालावधीचा तोडगा काढला होता.

सिंगदेव काँग्रेसमधून बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असल्याचं दिसतेय. मात्र, त्यांना पक्षातून तितकी साथ न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं. सिंगदेव म्हणाले की, मुख्यमंत्री भूपेशसिंग बाघेल हे चतुर आहेत. त्यांनी राहूल व प्रियांका या दोघांना अशा पद्धतीने हाताळले आहे, की छत्तीसगढ काँग्रेसमधील इतर काँग्रेसनेत्यांची त्यांच्याकडे डाळ शिजेनाशी झाली आहे.

loading image
go to top