शुभ मुहूर्ताच्या नावाखाली पत्नी 11 वर्षांपासून सासरी गेलीच नाही; कोर्टानं दिला मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhattisgarh Court

एका महिलेनं शुभ मुहूर्ताच्या नावाखाली 11 वर्षांपासून सासरच्या घरी जाण्यास नकार दिलाय.

शुभ मुहूर्ताच्या नावाखाली पत्नी 11 वर्षांपासून सासरी गेलीच नाही

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका महिलेनं शुभ मुहूर्ताच्या नावाखाली 11 वर्षांपासून सासरच्या घरी जाण्यास नकार दिलाय. हा प्रकार कोर्टात पोहोचल्यावर, न्यायमूर्ती गौतम भादुरी (Justice Goutam Bhaduri) आणि रजनी दुबे (Rajni Dubey) यांच्या खंडपीठानं हे प्रकरण हिंदू विवाह कायद्यात पारित केलं. न्यायालयानंही या कायद्यान्वये घटस्फोट मंजूर केलाय.

हेही वाचा: 'मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे'; OSCPCR चा कायद्याला विरोध

वास्तविक, संतोष सिंह (Santosh Singh) नावाच्या व्यक्तीनं परित्यागाच्या कारणावरून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या आधारावर घटस्फोट देण्यास नकार देत न्यायालयानं याचिका फेटाळली होती. त्यानंतर संतोषनं उच्च न्यायालयात (High Court) घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. संतोषनं याचिकेत म्हटलं होतं की, 2010 मध्ये लग्नानंतर त्याची पत्नी केवळ 11 दिवसच त्याच्यासोबत राहिली आणि नंतर आपल्या माहेरी गेली. तेथून त्यानं अनेकवेळा पत्नीला परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिनं प्रत्येक वेळी शुभ मुहूर्त नसल्याचं सांगून येण्यास नकार दिला. त्याचवेळी पत्नीनं सांगितलं की, शुभ मुहूर्तावर तिचा नवरा तिला घेण्यासाठी आला नाही, त्यामुळं ती सासरच्या घरी जाऊ शकली नाही. तसेच तिनं आपल्या पतीला सोडलं नाही, ती फक्त तिच्या प्रथा पाळत असल्याचं तिनं सांगितलं.

हेही वाचा: मुकेश अंबानींनी 800 रुपयांत काम करणाऱ्या नीताशी का केलं लग्न?

न्यायालयानं घटस्फोट केला मंजूर

या प्रकरणावर न्यायालयानं (Chhattisgarh Court) म्हटलंय, की शुभ मुहूर्त हा कुटुंबाच्या आनंदी काळासाठी असतो, परंतु या प्रकरणात त्याचा अडथळा म्हणून वापर केला जातो. न्यायालयानं हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (IB) अंतर्गत घटस्फोटाचा हुकूम मंजूर केलाय. आपल्या आदेशात न्यायालयानं असंही म्हटलंय की, वस्तुस्थितीनुसार पत्नीनं पतीला पूर्णपणे सोडलं होतं, त्यामुळं घटस्फोट हा पतीचा अधिकार आहे.

Web Title: Chhattisgarh Wife Kept Away From Husband For 11 Years On The Name Of Auspicious Time High Court Approved The Application For Divorce

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chhattisgarhhigh court
go to top