Devraj Patel : भाई दिल से बुरा लगा है! प्रसिद्ध युट्युबर देवराज पटेलचा मृत्यू; काय घडलंय वाचा

मृत्यूपूर्वी देवराजनं बनवला होता व्हिडिओ
Devraj Patel
Devraj Patel

YouTuber Devraj Patel Died : 'भाई दिल से बुरा लगता है' या नावाच्या व्हिडिओमुळं सोशल मीडियात फेमस झालेला कॉमेडियन युट्युबर देवराज पटेल याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सर्वांना हसवणाऱ्या छत्तीसगडचा मुलगा देवराजचा असा मृत्यू होणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. (Chhattisgarh YouTuber Devraj Patel Died in road accident)

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील तेलीबांधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात देवराज पटेल याचा मृत्यू झाला. देवराज आपल्या बाईकवरुन निघाला असताना एका भरधाव ट्रकनं त्याच्या बाईकला टक्कर दिली. या अपघातात देवराजचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा एक मित्र यात गंभीररित्या जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Devraj Patel
Video: अंतराळात झालं ICC World Cup 2023च्या चषकाचं अनावरण! पाहा भन्नाट व्हिडिओ

देवराजचे युट्युबवर आहेत लाखो फॉलोवर्स

देवराज पटेल हा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह होता. युट्यूबवरही त्याचे लाखो सबस्क्राईबर आहेत. इथं लोकांना हसवण्यासाठी तो बहुतकरुन कॉमेडी व्हिडिओ बनवायचा. देवराजचा असा अचानक मृत्यू झाल्यानं त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. इंटरनेटवरही देवराज पटेल नावाचा ट्रेंड सुरु झाला असून नेटकरी त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. (Marathi Tajya Batmya)

Devraj Patel
जगातील सर्वाधिक 10 प्रदुषित शहरं! भारताच्या तीन शहरांचा समावेश: Polluted Cities

मृत्यूपूर्वी देवराजनं बनवला होता व्हिडिओ

देवराज हा महासमुंद जिल्ह्याचा रहिवासी होता. त्यानं 'भाई दिल से बुरा लगता है' हा व्हिडिओ बनवला तो लाखो लोकांना आवडला. त्यामुळं तो सोशल मीडियावर फेमस झाला. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा सुरु झाल्यानं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्याची भेट घेतली होती.

दुसरीकडं मृत्यूपूर्वी देखील त्यानं आपल्या युट्युबवर नवा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्या मृत्यूपूर्वी चार तास आधीच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओत तो आपल्या फॅन्सना बाय करताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com