esakal | चिदंबरम यांचा मोदी सरकारला इशारा; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

चिदंबरम यांचा मोदी सरकारला इशारा; व्हिडिओ व्हायरल

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज (ता.03) ढासळत्या जीडीपीवरून मोदी सरकारवर निषाणा साधला. मागील एका वर्षात जीडीपी 08 टक्क्यांवरून 05 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने सर्वच स्तरातून टीका होत असताना पी. चिदंबरम यांनीही टीका केली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

चिदंबरम यांचा मोदी सरकारला इशारा; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज (ता.03) ढासळत्या जीडीपीवरून मोदी सरकारवर निषाणा साधला. मागील एका वर्षात जीडीपी 08 टक्क्यांवरून 05 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने सर्वच स्तरातून टीका होत असताना पी. चिदंबरम यांनीही टीका केली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 


सध्याचा जीडीपी दर हा मागील सहा वर्षातील सर्वात निचांकी आहे. त्यावरून चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. कोर्ट रूममधून चिदंबरम यांना बाहेर घेऊन जात असताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की सीबीआय अटकेवर तुम्ही काही बोलणार का? या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम यांनी केवळ 5% असा इशारा केला. तेव्हाच त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

'या' सात कारणांमुळे शेअर बाजारात झाली पडझड
 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. मला काही सांगायचे आहे त्यापेक्षा 5% जीडीपीची आठवण चिदंबरम यांच्या कृतीतून दिसत असल्याचे काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून दाखवण्यात आले. 

loading image
go to top