esakal | 'या' सात कारणांमुळे शेअर बाजारात झाली पडझड
sakal

बोलून बातमी शोधा

'या' सात कारणांमुळे शेअर बाजारात झाली पडझड

भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच मोठी पडझड पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या जीडीपी आणि उत्पादन वाढीची आकडेवारी त्याचबरोबर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण याचा मोठा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले.

'या' सात कारणांमुळे शेअर बाजारात झाली पडझड

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच मोठी पडझड पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या जीडीपी आणि उत्पादन वाढीची आकडेवारी त्याचबरोबर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण याचा मोठा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीत अनुक्रमे 836 व 243 अंशांची घसरण होऊन सेन्सेक्स 36,503 तर निफ्टी 10,779 अंशांवर स्थिरावला. 

वाहनविक्रीचा आलेख ऑगस्टमध्येही उतरताच

आजच्या पडझडीला कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घडामोडी 
१) शेअर बाजारातील पडझडीत बँकिंग समभाग आघाडीवर होते. बँक विलीनीकरणानंतर सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांचे शेअर्स मोठ्या दबावात व्यवहार करून बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांकात सुमारे 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. प्रामुख्याने पीएनबी (8%), आयसीआयसीआय बँक (4%), एचडीएफसी (4%), इंडसइंड बँक (2.5%), ऍक्सिस बँक (2.3%), एसबीआय (2%) त्याचबरोबर सार्वजनिक बँकांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. 

अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण- प्रियांका गांधी

२) ऑटो निर्देशांक देखील मोठ्या प्रमाणात घसरला. टाटा मोटर्स आणि आयशर मोटर्सचे शेअर्समध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसहित आघाडीवर राहिले. 

३) ऊर्जा, धातू, ऑइल अँड गॅस सहित इतर सर्वच निर्देशांकाबरोबर बीएसईचे स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅप निर्देशांक २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. 

उत्पादन क्षेत्रातील हालचाली मंदावल्या

४) रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसी गॅस प्लांटला लागलेल्या आगीमुळे ONGCच्या शेअरमध्ये 3.34 टक्क्यांची घसरण झाली. 

५) अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज 103 पैशांनी घसरून 72.37 वर आला होता.

६) परकी गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक काढून घेत असल्याने शेअर बाजारात सेलिंगचा दबाव दिसून येत आहे. गेल्या महिन्यात परकी गुंतवणूकदारांनी 2.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली. 

औद्योगिक क्षेत्राला घरघर ! जुलैत या आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ 2.1 टक्के

७) अमेरिका- चीन या दोन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार युद्धांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजार संमिश्र व्यवहार करून बंद झाले.

loading image
go to top