P. Chidambaram: गृहमंत्री अमित शहा यांच्या टिपण्णीत तथ्य नाही; अफजल गुरु प्रकरणावर चिदंबरम यांची स्पष्ट भूमिका
Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी अफजल गुरुच्या फाशीबाबत केलेल्या टिपणीवर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून ती भ्रामक आणि असत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात दया याचिका प्रलंबित असल्याचा खुलासा केला.
नवी दिल्ली : संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरु याच्या फाशी संदर्भातील आपल्यावरील गृहमंत्री अमित शहा यांची टिपणी म्हणजे असत्य आणि भ्रामक गोष्टींचे मिश्रण असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी दिली आहे.