Protesters Detained During Demonstration Demanding the Chief Election Commissioner’s Resignation
esakal
नवी दिल्ली, : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज देशभर कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) कार्यकर्ते मैदानामध्ये उतरले खरे, पण ठिकठिकाणी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना रोखण्यात आले. या आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या राजधानी दिल्लीमध्ये सात हजार कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
‘सीजेपी’चे वरिष्ठ नेतृत्व अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची रविवारी विशेष सुनावणी होणार आहे.
या आंदोलनास बळ देऊ पाहणाऱ्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.‘सीजेपी’च्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी मैदानामध्ये उतरली असून सोमवारी (ता.१२) आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येईल.