Chief Justice Bhushan Gavai: देशात सर्वांनाच शुद्ध हवेचा अधिकार; सरन्यायाधीश गवई ,फटाक्यांवर बंदी केवळ दिल्लीपुरतीच का?
Supreme Court: सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर सुनावणी दरम्यान सांगितले की, शुद्ध हवेचा अधिकार फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाही, तर तो देशभरातील लोकांचा आहे. फटाक्यांवर बंदी दिल्लीपुरता ठेवता येणार नाही, देशभर बंदी लागू केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : ‘‘केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरातील लोकांना शुद्ध हवेचा अधिकार आहे,’’ असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी प्रदूषणाच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान सांगितले.