इंग्रजीबद्दल सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवर सॉलिसिटर जनरल म्हणाले, 'Same Here' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CJI nv ramana

केंद्र सरकारच्यावतीने तुषार मेहतांनी दिल्ली प्रदुषणावर बाजू मांडत असताना त्यांच्या स्टेटमेंटचा अर्थ वेगळा घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिलं.

सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवर सॉलिसिटर जनरल म्हणाले, 'Same Here'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी सर्वोच्च न्यायालायत सुनावणीवेळी म्हटलं की, मी काही वक्ता नाही आणि इयत्ता आठवीमध्ये शिकत असताना इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सरन्यायाधीशांनी ही प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारच्यावतीने तुषार मेहतांनी दिल्ली प्रदुषणावर बाजू मांडत असताना त्यांच्या स्टेटमेंटचा अर्थ वेगळा घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, दिल्लीच्या वायु प्रदुषणासाठी फक्त शेतकरी जबाबदार आहेत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ अजिबात नव्हता.

मेहता यांना सरन्यायाधीश म्हणाले की, माझ्यात तेवढी कमतरता आहे, मी इयत्ता आठवीपासून इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. मी काही वक्ता नाही, मला व्यक्त होण्यासाठी खूप चांगलं इंग्रजी येत नाही. मी कायद्याचा अभ्यास इंग्रजीतच केला होता असेही सरन्यायाधीश म्हणाले. तुषार मेहता यांनी म्हटलं होतं की, वकिल म्हणून आमच्याकडून ज्या भाषेत उत्तर घेतलं जातं त्यातून चुकीचा मेसेज जाऊ शकतो, कदाचित आम्हाला तसं म्हणायचं नसतं

मेहता यांनीही सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवर बोलताना माझ्याबाबतीतही असंच होतं असं उत्तर दिलं. मीसुद्धा ८ वीमध्ये इंग्रजी शिकायला सुरुवात केली. पदवीपर्यंत गुजराती माध्यमातून शिक्षण झालं. आपण एकाच नावेतून जाणारे प्रवाशी आहे. मीसुद्धा कायद्याचा अभ्यास इंग्रजीतून केला असे मेहता म्हणाले.

हेही वाचा: PMAY-G : मोदींनी १.४७ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले ७०० कोटी

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआऱमध्ये हवा प्रदुषणाच्या वाढीला आणीबाणी घोषित केलं आहे. केंद्र आणि दिल्ली सरकारने हवेची गुणवत्ता सुधाऱण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचं न्यायालयाने म्हटलं. वाहनांवर बंदी घालून राजधानीत लॉकडाऊन लागू करण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सरन्यायाधीशांनी म्हटलं की, प्रदुषण कमी व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काही नाही. न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. प्रदुषणासाठी वाहनातून निघणारा धूर, फटाक्यांची आतषबाजी, धूळ इत्यादी जबाबदार आहेत. फक्त गव्हाचे उरलेले अवशेष जाळल्यानं प्रदुषण होतंय म्हणता येणार नाही असंही मत न्यायालयाने व्यक्त केलं.

loading image
go to top