

नवी दिल्ली- भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी लॉ विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात बोलताना आपल्या दिवंगत पत्नीविषयीचा किस्सा सांगितला. सरन्यायाधीश कधी आपल्या वैयक्तिक गोष्टी बोलताना दिसत नाहीत, पण विद्यार्थ्यांना समजावं यासाठी त्यांनी उदाहरण दिलं. माहितीनुसार, पत्नीचा उल्लेख त्यांच्या नियोजित भाषणात नव्हता, पण त्यांनी अचानक दिवंगत पत्नीचा उल्लेख केला. कायदा व्यवसायात असलेल्या आव्हानांबाबत त्यांनी यावेळी भाष्य केलं. (Chief Justice of India DY Chandrachud speech Mention Of Late Wife)
सरन्यायाधीश म्हणाले की, 'माझी दिवंगत पत्नी वकील होती. ती मुलाखत देण्यासाठी गेली तेव्हा तिला सांगण्यात आलं की कामाचे तास 24x7 आणि 365 दिवस असेल. कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही. तिला सांगण्यात आलं की पती असा निवडा ज्याला घरकाम करता येतं.' परिस्थिती आता बदलत असल्याचं चंद्रचूड म्हणाले.
बेंगळुरुतील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या ३१ व्या दिक्षांत सोहळ्यात सरन्यायाधीश विद्यार्थांना संबोधित करत होते. लॉ कार्यालयांमध्ये योग्य कामाचे तास आणि वर्क-लाईफ बॅलेन्स असायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कार्यालयामध्ये महिलांसाठी मैत्रिपूर्ण वातावरण असायला हवं. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या त्रासामध्ये मी 'वर्क फ्रॉम होम' देतो असंही त्यांनी सांगितलं.
मागील वर्षी माझ्या कार्यालयातील पाचपैकी चार लॉ क्लर्क महिला होत्या. त्या मला मोकळेपणाने फोन करतात आणि म्हणतात, सर, मला सध्या मासिकपाळीचा त्रास सुरु आहे. मी त्यांना घरुन काम करण्यास आणि तब्येतीची काळजी घेण्यास सांगतो. आपण याविषयी मोकळेपणे बोलायला हवं. हा विषय अस्तित्वातच नाही असं आपण वागू शकत नाही, असं ते म्हणाले.
सुप्रिम कोर्टाच्या महिला टॉयलेटमध्ये सॅनेटरी नॅपकीन ठेवण्यात आलेले आहेत. आपल्या कामाचे ठिकाण सर्वांना संधी देणारे असे करायचे असेल, तर आपल्याला या विषयांवर मोकळेपणाणे बोलावे लागेल. सरन्यायाधीशांनी नुकत्याच जारी केलेल्या पुस्तिकेवरही भाष्य केलं. महिलांबाबत पूर्वगृहदूषित काही वापरले जाणारे शब्द आपण टाळले आहेत. न्यायमूर्तींना याबाबत सूचना देण्यात आलेत, असं ते म्हणाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.