cm dr. mohan yadav
sakal
छठ महापर्वानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी (१५ नोव्हेंबर) भोपाळ येथील प्रेमपुरा घाटावर उपस्थित राहून भगवान सूर्यदेवाला संध्या अर्घ्य अर्पण केले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांचे सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य यासाठी प्रार्थना केली. तसेच छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.