

Odisha Tourism
sakal
भुवनेश्वर : हिवाळ्याची चाहूल लागताच चिलिका सरोवर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले आहे. आशियातील या सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या विस्तीर्ण परिसरात पन्नासहून अधिक प्रजातींचे हजारो स्थलांतरित, परदेशातून येणारे पक्षी दाखल झाले आहेत. यामुळे देश-विदेशातील पर्यटक चिलिकाकडे येऊ लागले आहे.