esakal | अखेर चीन झुकला; गलवान खोऱ्यातील सैन्याला दिले आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

 chin withdraw troops from galwan valley

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (LAC)माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. चीनने गलवान खोऱ्यातून आपल्या सैनिकांना कमीतकमी 1.5 किलोमीटर मागे घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अखेर चीन झुकला; गलवान खोऱ्यातील सैन्याला दिले आदेश 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (LAC)माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. चीनने गलवान खोऱ्यातून आपल्या सैनिकांना कमीतकमी 1.5 किलोमीटर मागे घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उभय देशांमधील सैनिकांमध्ये 15 जून रोजी झालेल्या संघर्षाच्या ठिकाणाहून 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सैनिकांनीही माघार घेतली असून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एक बफर झोन बनला आहे. 

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी गलवान नदीपासून मागे घटण्यास सुरुवात केली आहे. तसेच येथे उभारण्यात आलेले तंबू आणि इतर बांधकाम काढण्यात आले आहे. मात्र, चीन पुन्हा या भागात घुसखोरी करणार नाही ना, याबाबत जागरुक राहावं लागणार आहे. मात्र, सध्या तरी चीनने माघार घेतली असल्याची पुष्टी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला अचानक भेट दिली होती. त्यानंतर तीन दिवसांनी चीन मागे हटल्याची माहिती आली आहे. मोदींनी लडाखमध्ये भारतीय जवानांना संबोधित करताना नाव न घेता चीनला सज्जड दम दिला होता. विस्तारवादाचे युग आता संपले आहे, हे विकासाचे युग आहे. इतिहास साक्ष आहे, विस्तारवादाने मानवजातीचा विनाशच झाला आहे. त्यामुळे विस्तारवाद सोडून सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न करायला हवेत, असं म्हणत मोदींनी इशारा दिला होता.  

चीनला धडा शिकव्यासाठी भारताकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. 59 चिनी अॅप्सवर भारत सरकारकडून बंदी आणण्यात आली होती. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे सैन्य मागे घेण्यासाठी चीनवर दबाव वाढला होता. तसेच भारताने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे भारताच्या हालचालींना यश आल्याचं सध्या तरी दिसत आहे.

ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी ४० नवे कोरोना पॉझिटीव्ह....
पूर्वी लडाखच्या गलवान भागात उभय देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 43 जवान मारले गेल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर बैठकी होत होत्या. मात्र, दोघांमधील तणाव निवळत नव्हता. दोन्ही देशांनी सीमा भागात सैनिकांनी जमवाजमव सुरु केली होती. जवळजवळ 30 हजार दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद केव्हा मिटतो, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. सोमवारी एक चांगली बातमी आली आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंत माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद निवळेल अशी आशा आहे.

loading image