esakal | चीनकडून द्विपक्षीय संबंधांच्या पायालाच तडा : जयशंकर
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel

चीनकडून द्विपक्षीय संबंधांच्या पायालाच तडा : जयशंकर

sakal_logo
By
पीटीआय

मॉस्को - ‘मागील वर्षभरात भारत- चीन संबंधांबाबत (India Chin Relation) चिंता (Care) निर्माण व्हावी अशीच स्थिती आहे. सीमावादासंदर्भात चीन करार (Agreement) पाळायला तयार नाही यामुळे द्विपक्षीय संबंधांच्या पायाला मोठा तडा गेला आहे.’’ असे स्पष्ट मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी आज मांडले. (China Cracks Down on Bilateral Ties Jaishankar)

मागील चाळीस वर्षांमध्ये चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध स्थिर होते, आमच्या व्यापारामध्येही तो दुसरा मोठा भागीदार देश बनला होता. पण मागील वर्षभरात सगळी स्थितीच बदलली. सीमावादाबाबत झालेले करार पाळायला चीन तयार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. येथे ‘प्रिमाकोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकोनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स’मध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

हेही वाचा: कोरोनानंतर आता झिकाचं संकट?; केरळमध्ये एका महिलेला लागण!

‘आता तब्बल ४५ वर्षांनंतर सीमेवर हिंसक चकमक झाली असून यामध्ये जीवितहानी देखील झाली आहे. दोन देशांमध्ये उत्तम संबंध राहायचे असतील तर सीमेवर शांतता असणे खूप गरजेचे असते. या संघर्षामुळे द्विपक्षीय संबंधांच्या पायालाच मोठा धक्का बसला आहे.’’ असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. मागील वर्षीच्या मे महिन्यापासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सीमेवर अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला असून दोन्ही देशांच्या लष्करांत हिंसक चकमकी देखील झाल्या आहेत. या संघर्षानंतर दोन्ही देशांनी लष्करी आणि राजनैतिक मार्गाने चर्चा करत हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला असून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून लष्करी तुकड्या आणि शस्त्रे माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

स्पर्धा होऊच शकत नाही

या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील आण्विक स्पर्धेबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले की, ‘‘ भारतापेक्षा चीनची आण्विक ताकद मोठी आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये स्पर्धा होऊ शकत नाही. चीन १९६४ मध्ये आण्विक शक्ती बनला होता भारताने १९९८ मध्ये हे ध्येय गाठले होते.’’ राजकीय आघाडीवर भारत आणि रशियाने एकत्र येत काम करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. जयशंकर हे सध्या रशिया दौऱ्यावर असून ते रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट घेतील.

loading image