esakal | कोरोनानंतर आता झिकाचं संकट?; केरळमध्ये एका महिलेला लागण!
sakal

बोलून बातमी शोधा

 mosquitos

कोरोनानंतर आता झिकाचं संकट?; केरळमध्ये एका महिलेला लागण!

sakal_logo
By
अमित उजागरे

तिरुअनंतपुरम : देशभर कोरोना संसर्गाची लाट अद्याप ओसरली नसताना केरळमध्ये झिका विषाणूचे १३ संशयीत रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एका २४ वर्षीय महिलेमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचं निश्चित झालं आहे.

हेही वाचा: कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी, आरोग्य सेवांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा

थिरुवअनंतपुरमच्या परसाला येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केरळच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. या महिलेला ताप, डेकेदुखी आणि शरिराव लाल चट्टे उठल्याने तिला २८ जून रोजी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिने ७ जुलै रोजी बाळाला जन्मही दिला आहे. या महिलेने केरळ राज्याबाहेर प्रवासही केला नव्हता. पण तिचं घर हे केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. आठवड्याभरापूर्वी तिच्या आईला देखील अशीच लक्षणं होती.

हेही वाचा: युती-आघाडीची चिंता नको, घराघरांत पोहचा; उद्धव ठाकरेंचे आदेश

डासांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. युगांडामध्ये १९४७ साली सुरुवातीला माकडांमध्ये हा विषाणू आढळून आला होता त्यानंतर त्याचा माणसाला संसर्ग झाला. काही महिन्यांपूर्वी झिका विषाणूच्या संसर्गाचा ब्राझिलमध्ये उद्रेक झाला होता. या आजारामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असून त्यामुळे पॅरेलिसिस आणि मृ्त्यूही ओढवल्याची उदाहरणं आहेत, असं जागतीक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

भारतात यापूर्वीही आढळले होते रुग्ण

भारतात २०१८ मध्ये जयपूर येथे झिका विषाणूचे ८० रुग्ण आढळले होते. हा भारतातील या विषाणूच्या संसर्गाचा पहिलाच मोठा उद्रेक होता. त्यानंतर आता केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने काळजी भर पडू शकते.

loading image