चीनच्या कुरापती वाढल्या; सीमेजवळ उभारले तीन मोबाईल टॉवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile tower china border

चीनच्या कुरापती वाढल्या; सीमेजवळ उभारले तीन मोबाईल टॉवर

लडाख : चीनच्या भारताच्या सीमेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत असताना आता लडाखमधील पॅंगॉंग तलावाजवळील पूलाच्या बांधकामानंतर चीनने भारताच्या सीमेवर टॉवर उभे केले आहेत, असा दावा चुशुल प्रदेशातील एका नगरसेवकाने केला आहे. भारत सीमेच्या अगदी जवळ चीनने तीन मोबाईल टॉवर उभारले असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट करत दिली.

चीनने भारताच्या सीमेवर उभारलेल्या टॉवरमुळे खळबळ उडाली आहे. याबाबतची छायाचित्रे स्थानिक नगरसेवकाने पोस्ट केले आहेत. चीनने १९६२ मध्ये अवैधरित्या ताब्यात घेतलेल्या जमिनीवर हे बांधकाम करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: कोरोना मृत्यूमुळे वाद, PM मोदींसह WHO प्रमुख गुजरात दौऱ्यावर

लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक कोंचोक स्टँझिन यांनी सदर मोबाईल टॉवरचे फोटो ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. चीनच्या अशा प्रकारच्या कुरापती हा चिंतेचा विषय नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या मतदारसंघातील ११ गावांमध्ये 4G सेवा नसताना चीनने अशा कुरापती केल्या आहेत. आपल्या भागात अशी सेवा नसताना मात्र चीनच्या सीमेवरील भागात ९ टॉवर आहेत आणि आता ३ टॉवर नव्याने उभारण्यात आले आहेत. असं ते म्हणाले.

विकासाच्या बाबतीत चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सरकारला आग्रह केला आहे. दरम्यान २०२० मध्ये पॅगॉंग भागातील लष्कराच्या चकमकीनंतर लडाख सीमेवर तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा: भाजपच्या विजयामुळे निराश झालेले लोक हिंसाचार घडवतात : जे. पी. नड्डा

चुशुल हे गाव सीमोरेषेपासून ८ किमी पश्चिमेकडे असून गावापासून पूर्व दिशेला सीमा आहे. याअगोदरही चीनच्या अवैध बांधकामाची माहिती लोकसभेत देण्यात आली होती. त्यानंतर चीनने पॅगॉंग तलावाच्या जवळ पूलाचे बांधकाम केलं होतं.

Web Title: China Developed Mobile Tower On Border Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..