बँकॉक : अमेरिकेने आयातशुल्कवाढीच्या माध्यमातून पुकारलेल्या व्यापार युद्धाला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे. अमेरिकेच्या उत्पादनांवर चीन आता ८४ टक्के एवढे जबरदस्त आयातशुल्क आकारणार आहे. .अमेरिकी धोरणाला विरोध करण्यासाठी चीन सरकार जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) आणखी नव्याने काही खटले दाखल करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकेला आमच्यावर निर्बंध घालून हा आर्थिक संघर्ष आणखी वाढवायचा असेल तर चीन देखील तितक्याच ताकदीने प्रतिकार करेल असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी चीन- अमेरिका व्यापाराबाबत श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली. अमेरिकेच्या अकरा कंपन्यांच्या व्यवहारांवर चीनने निर्बंध घातले असून त्यांना आता त्यांची उत्पादने चिनी हद्दीमध्ये विकता येणार नाहीत..ट्रम्प यांनी सुरुवातीला चीनवर ५० टक्के एवढे आयातशुल्क लादले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही ३४ टक्के एवढे आयातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी यात आयातशुल्काचे प्रमाण १०४ टक्क्यांवर नेले होते, त्याला पुन्हा चीनने प्रत्युत्तर देत अमेरिकी उत्पादनांवर ८४ टक्के एवढे जबरदस्त आयातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला खरोखरच चर्चेच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढायचा असेल तर त्यांनीही आम्हाला समान आदराची वागणूक द्यावी अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी व्यक्त केली. .चीनने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये म्हटले आहे की व्यापार कराराच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये ज्या अटी आणि शर्तींचे पालन अमेरिकेने करणे आवश्यक होते ते त्यांनी केलेले नाही. टिकटॉक या अॅपच्या व्यवहारामध्ये आमच्यावर अशाच प्रकारे अन्याय करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या हस्तांतराबाबत आम्ही कुणावर देखील दबाव आणणार नाही असे अमेरिकेने आधीच सांगितले होते पण नंतर मात्र घुमजाव केले..युरोपही आक्रमकयुरोपीय महासंघाचे सदस्य असणाऱ्या देशांनी अमेरिकेवर आयातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या २१ अब्ज पौंडांच्या उत्पादनांवर आयात शुल्क आकारण्यात येईल.ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर २५ टक्के एवढे आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली होती, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपीय देशही एकवटले आहेत. युरोपमधील २७ देशांनी अमेरिकेवर आयातशुल्क वाढविण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.