China Vs India : चीनमुळे भारताच्या दक्षिणी जगातील वर्चस्वाला धोका; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे भाष्य; विकासाला आव्हान
Upendra Dwivedi : चीनच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षिणी जगात भारताच्या नैसर्गिक वर्चस्वाला धोका निर्माण होत आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. भारताने भविष्यात आफ्रिकेला संधी म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.
नवी दिल्ली : चीनचे वाढते सामर्थ्य आणि जागतिक पातळीवरचा वाढता प्रभाव पाहता त्याची भूमिका दक्षिणी जगात भारताच्या नैसर्गिक वर्चस्वाला आव्हान देणारी आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले.