esakal | बाग्राम हवाई तळ बळकावण्याचा चीनचा डाव
sakal

बोलून बातमी शोधा

bagram

बाग्राम हवाई तळ बळकावण्याचा चीनचा डाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील बाग्राम हवाई तळ बळकावण्याचा चीनचा डाव आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे, असा इशारा अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी दिली. भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी पाकिस्तानला भक्कम पाठबळ देण्याचाही चीनचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

संयुक्त राष्ट्रांवरील (यूएन) अमेरिकेच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावल्यामुळे आता चीनकडे तातडीने लक्ष द्यावे लागेल असे त्यांना वाटते. बाग्राम हवाई तळ सुमारे दोन दशके अमेरिकेच्या नियंत्रणात होता. यासंदर्भात हॅले यांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाला उद्देशून आवाहनही केले.

भारत, जपान, ऑस्ट्रेलिया अशा मित्र देशांशी संपर्क साधून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही प्रशासनाने देण्याची ही वेळ आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पहिली गोष्ट तुम्हाला ही करायला हवी की मित्र देशांपर्यंत पोहचा. मग तो तैवान असेल, युक्रेन असेल किंवा इस्राईल अथवा भारत, ऑस्ट्रेलिया किंवा जपान...अशा सर्वांना ग्वाही द्या. त्यांना सांगा की आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे.

भारताच्या संदर्भात हॅले यांनी सांगितले की, अफगाणिस्तानात हालचाली करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताविरुद्ध पाकला बळ देण्याचाही प्रयत्न ते करतील. आपल्यासमोर एकूण बरीच आव्हाने आहेत. अशावेळी बायडेन यांनी आपल्या मित्रांना भक्कम बनवावे, त्यांच्याबरोबरील संबंध बळकट करावेत, आपले लष्कर आधुनिक बनवावे. आपल्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य सायबर-गुन्हे आणि दहशतवादी कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे.

हेही वाचा: जगापुढे कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे

सामूहिक हत्याकांडे घडतील

जगभर आपल्याला दहशतवादाच्या विरोधात प्रयत्न करावे लागतील. याचे कारण जिहादींनी नैतिक विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे ते जगभर दहशतवाद्यांचा आपल्या ताफ्यात भरणा करण्यासाठी मोहिमा राबवतील. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक हत्याकांडाचे प्रकार घडलेले तुम्हाला पाहायला मिळेल, असेही निकी हॅले यांनी म्हटले आहे.

रशियाबाबतही इशारा

हॅले यांनी रशियाबाबतही इशारा दिला. त्या म्हणाल्या की, रशियासारखे प्रतिस्पर्धी हॅकींग सुरु ठेवतील, कारण आपण प्रतिकाराची कोणतेही इच्छा प्रदर्शित केलेली नाही.

loading image
go to top