Chinese loan Apps Case: पेटीएमसह रोजरपेवर ED ची छापेमारी; 17 कोटी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेटीएम

Chinese loan Apps Case: पेटीएमसह रोजरपेवर ED ची छापेमारी; 17 कोटी जप्त

चीनी कर्ज ॲपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेंगळुरूमधील ऑनलाइन पेमेंट गेटवे- Razorpay, Paytm, Cashfree च्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सहा ठिकाणांवर करण्यात आलेली ही कारवाई दुसऱ्या दिवशीदेखील सुरू आहे. या छापेमारीमध्ये तपास यंत्रणेने मर्चंट आयडी आणि चिनी लोकांच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले 17 कोटी रुपये जप्त केले आहेत.

तपास कोणत्या आधारावर सुरू

ईडीच्या म्हणण्यानुसार, तपासाचे हे प्रकरण बेंगळुरूतील सायबर क्राइम पोलीस स्टेशनने नोंदवलेल्या 18 एफआयआरवर आधारित आहे. ही एफआयआर अनेक संस्था/व्यक्तींविरुद्ध नोंदवण्यात आली असून, यामध्ये मोबाईल अॅपद्वारे अल्प रकमेचे कर्ज घेऊन संस्था किंवा व्यक्तींची पिळवणूक आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित कंपन्या भारतीय नागरिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांना डमी संचालक बनवून बेकायदेशीर उत्पन्न मिळवत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच या संस्थांवर चीनमधील लोकांचे नियंत्रण असल्याचेही ईडीने म्हटले आहे. या संस्था पेमेंट गेटवे आणि विविध मर्चंट आयडी आणि बँकांमध्ये ठेवलेल्या खात्यांद्वारे संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत.

टॅग्स :bangaloreEDED raid