चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sudarlal bahuguna

चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणांचे निधन

नवी दिल्ली- चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना AIIMS हृषीकेशमध्ये दाखल करण्यात आले होते. बहुगुणा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य पर्यावरणासंबंधी जनजागृती करण्यामध्ये घालवले. मानवामुळे जंगलाचे आणि हिमालय भागाचे होणारे नुकसान याबाबत त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नामुळे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना झाडांच्या कटाईवर बंदी आणावी लागली होती. 'पर्यावरण ही शाश्वत अर्थव्यवस्था आहे' हे त्यांचे स्लोगन प्रसिद्ध आहे.

चिपको आंदोलनाचे प्रणेते

चिपको हे 1973 मधील अंहिसात्मक आंदोलन होते. जैवविविधता आणि झाडांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. महिलांचा या आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. आंदोलन उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यात (आताच्या उत्तराखंडमध्ये) 1973 मध्ये सुरु झाले होते, त्यानंतर ते उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये पसरले. चिपको आंदोलनामुळे गावकऱ्यांनी झाडाला आलिंगन दिले होते, त्यावरुन याला चिपको (चिटकने) असे नाव पडले. जंगलांना वाचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या आंदोलानकडे जगाचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा: 'PM मोदींनी इतर राज्यावर अन्याय केला नाही'

मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनीही ट्विटरवरून सुंदरलाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रावत यांनी म्हटलं की, चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी पद्म विभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त मिळाले. हे ऐकून धक्का बसला. फक्त उत्तराखंडचे नाही तर संपूर्ण देशाचे कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना 1986 मध्ये जमनालाल बजाज आणि 2009 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल.

पद्म विभूषण सुंदरलाल बहुगुणा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात दाखल होण्याआधी त्यांना ताप आला होता. डेहराडूनमधील एका खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

loading image
go to top