उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर राहिल्यास आनंद; चंद्रकांत पाटलांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CHANDRKANT PATIL

'PM मोदींनी इतर राज्यावर अन्याय केला नाही'

पुणे : '''पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला भेट दिली. पण इतर राज्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच गुजारात राज्याला 1000 कोटींची मदत जाहीर केल्याने इतर राज्यांसोबत अन्याय केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यावर प्रत्यूतर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ''पंतप्रधान मोदींनी इतर राज्यावर अन्याय केलेला नाही, त्यांनी फक्त गुजरातसाठी स्पेसिफिक मदत केली नाही. सरसकट मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख पॅकेज जाहीर केले आहे. पंतप्रधान हे पद असे आहे की त्यात रिस्क घेता येत नाही, इंदिरा गांधी ही अशाचप्रकारे प्रवास करायच्या. टीका टिप्पणी करताना इतिहास ही अभ्यासावा'''

हेही वाचा: 'माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले'

दरम्यान, तौक्ते वादळाच्या (Tauktae Cyclone) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) सकाळपासून कोकण दौऱ्यावर आहे. ''मी कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही.'' असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगवाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnvis)हेही कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते वादळाच्या (Tauktae Cyclone) पार्श्वभूमीवर गुजरातची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे ''मी जमिनीवरुन आलो, हवेतून नाही'' यांनी खोचक प्रतिक्रिया देखील दिली.

यावर प्रत्यूतर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी दौरा दोघांनी जमिनीवरून केला हवेतून नाही केला.'' तसेच ''उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले दीड वर्षांनंतर ते बाहेर पडले, त्यामुळे इतरांना उपदेश करण्याचं कारण नाही. तुमचे पाय जमिनीवर राहण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! सरकार सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय वर हवेत आहे त्यामुळे आता जमिनीवर राहिल्यास आनंद आहे'' अशी खोचक टोलाही त्यांनी यावेळी लागावला.

हेही वाचा: 'मी वैफल्यग्रस्त नाही'; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

loading image
go to top