Christmas Cake : कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

आज जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
cake
cake esakal

History Of First Christmas Cake : आज जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक जण या दिवशी केकचे नवनवीन प्रकार बनवून इतरांना खाऊ घालतात.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

cake
Christmas 2022 : ख्रिसमस सजावटीसाठी वापरले जाणारे रंग देतात 'हा' खास संदेश

मात्र,अनेकांना प्रश्न पडतो की, भारतात ख्रिसमस सण कधीपासून साजरा केला जातो आणि पहिला ख्रिसमसचा केक कसा आणि कुणी बनवला. आज आम्ही याबाबतच्या तुम्हाला असलेल्या उत्सुकतेबद्दल माहिती देणार आहोत.

साधारण १४० वर्षांपूर्वी भारतीय लोकांना ख्रिसमसची फारशी ओळख नव्हती. तसेच या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यामुळे भारतात देशातील अनेकजण व्यापर करण्यासाठी येत असत.

cake
New Year 2023 : ख्रिसमस, थर्टी फर्स्टला दारुची दुकानं पहाटे पाचपर्यंत राहणार सुरू

अशाच एका स्कॉट उद्योगपतीला ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या देशाची इतकी आठवण आली की, त्याने भारतीयांना एक नवीन पदार्थ चाखायला दिला आणि इथूनच भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची रंजक कथा सुरू झाली.

त्याकाळी केक बनवण्याची अत्याधुनिक साधनेही नव्हती किंवा ख्रिसमस केक तयार करण्यासाठी आवश्यक असणारे खास साहित्य सहज उपलब्ध नव्हते. असे असूनही, पहिला ख्रिसमस केक भारतात बनवला गेला आणि आजतागायत बनवला जात आहे.

cake
Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल तयार करा, चॉकलेट अँड आल्मंड रम बॉल

स्कॉट मर्चंटची बेकरी

वर्ष होते १८८३ आणि महिना होता नोव्हेंबर. मर्डाक ब्राउन हा स्कॉट्सचा व्यापारी ख्रिसमस केक बनवण्यासाठी रॉयल बिस्किट फॅक्टरी येथे पोहोचला. हा कारखाना आता दक्षिण भारतातील केरळ राज्यात आहे.

ख्रिसमस केक बनवण्यापूर्वी स्कॉट उद्योगपती मर्डाक ब्राउन यांनी मॅम्बली बापूंना समजावून सांगितले. ब्रेड आणि बिस्किटे कशी बेक करायची हे फक्त मांबळी बापूलाच माहीत होते.

cake
गोव्याच्या धर्तीवर उंट, घोड्यांसह रविवारी ‘वसई ख्रिसमस कार्निव्हल’

ब्रह्मदेशातील (सध्याचे म्यानमार) एका बिस्किट कारखान्यात तो हे कौशल्य शिकला. यापूर्वी त्याने कधी केक बनवला नव्हता. पण मांबली बापूंनी मिस्टर ब्राउनच्या सूचनेनुसार केक बनवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले.

आणि मग काय, घाईघाईत भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याची तयारी सुरू झाली. ख्रिसमस केकमध्ये ब्रँडीऐवजी काजू सफरचंद स्लरी आणि स्थानिक घटकांचा वापर केल्याने एक अनोखा प्लम केक तयार झाला.

cake
Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा एगलेस ड्रायफ्रूट केक

केरळमध्ये बनवलेला प्लम केक युरोपियन लोकांना खूप आवडला

स्कॉट उद्योगपती मर्डोक ब्राउनने जेव्हा मांबळी बापूंनी बनवलेल्या केकचा आस्वाद घेतला तेव्हा ते त्याच्या अप्रतिम चवीने आश्चर्यचकित झाले. तो इतका खूश झाला की त्याने मांबीला आणखी डझनभर केक बनवण्याची ऑर्डर दिली. अशा प्रकारे भारतात पहिला ख्रिसमस केक बनवला गेला.

मांबळी कुटुंबाने नंतर केरळमध्ये वेगवेगळ्या नावांनी अनेक आउटलेट उघडले, जे केक प्रेमींसाठी एक आवडते ठिकाण बनले.

आज एवढ्या वर्षानंतरही मांबळी यांच्या बेकरीतील केकची चव १४० वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे. त्यामुळे येथे आजही मोठ्या संख्येने लोक केक खाण्यास आवर्जून येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com