पाटणा: बिहारची राजधानी पाटणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे युवा नेते आणि एनएसयूआय (NSUI) चे राष्ट्रीय महासचिव शशी कुमार उर्फ चुन्नू सिंग हे गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहेत. चुन्नू सिंग हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.