
काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात मात्र एका नागरिकाला चक्क १० कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. या बिलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असलेली असताना अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केले आहे.
श्रीनगर - सध्या विजबिलाने सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. अव्वाच्या सव्वा येणाऱ्या बिलामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. पाचशेच्या आसपास असणारी बिलं आता हजार तर लाखो रुपयात येत आहेत. काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात मात्र एका नागरिकाला चक्क १० कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. या बिलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असलेली असताना अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पूंच जिल्ह्यातील मंधार भागातील गुगरान गावात मोहंमद हनिफ राहतात. त्यांना दोन दिवसांपूवी पॉवर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट (पीडीडी) आणि एईईकडून वीज बिल आले. मात्र वीजबिल पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना मे महिन्यांचे बिल सुमारे १० कोटी ८ लाख ३८ हजार १३८ रुपये इतके आले. हे बिल पाहून त्यांचे अवसान गळाले आणि त्यांनी सरपंचाकडे धाव घेतली. सरपंचांनी हे प्रकरण तहसीलदार मंधार आणि पीडीडी कार्यालयाकडे नेले. यादरम्यान, पीडीडी कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा