नागरिकांनो! आता तुम्हाला हवी ती लस घेऊ शकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield and Covaxin

नागरिकांनो! आता तुम्हाला हवी ती लस घेऊ शकता

नवी दिल्ली - नागरिकांना (Citizens) कोरोना प्रतिबंधक लसीची (Corona preventive vaccine) निवड (Selection) करण्याचा पर्याय अखेर केंद्र सरकारने (Cental Government) खुला केला आहे. त्यानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी (Registration) करतानाच कोव्हॅक्सीन (Covaxin) व कोव्हीशील्ड (Covishield) यापैकी कोणती लस घ्यायची आहे, याची निवड करता येईल. (Citizens Now you can get the vaccine you want)

हा पर्याय मिळावा अशी मागणी पहिल्या दिवसापासून केली जात होती. लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली त्यादिवशी दिल्लीतील राम मनोहर लोहिया आणि इतर काही रुग्णालयांतील डॉक्टरांनी एक विशिष्ट लस आपण टोचून घेणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन केले होते. त्यामुळे हा पर्याय देण्याबाबत केंद्रात चर्चा सुरू होती. त्यानुसार निर्णय प्रत्यक्षात आणण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीचा प्रभावी उपाय असलेले लसीकरण देशात वेगवान होण्यासाठी त्यावरील एकाधिकार करायला हवा अशीही मागणी जोर धरत आहे. केंद्राने १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण खुले केले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.

हेही वाचा: Srinivas BV : कोरोना संकटात ठरतोय देवदूत, परदेशातही चर्चा

जेव्हा नागरिक http://cowin.gov.in वर आपली नावनोंदणी करतील तेव्हा त्यांच्या मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल आणि लसीकरणाच्या वेळी तो संबंधित केंद्रावर दाखवून त्याची पुष्टी करावी लागेल. लसीकरणासाठीचे अपेक्षित केंद्र, पिन कोड आणि जिल्हा यांची नावे भरतानाच सहा पर्याय आता उपलब्ध होतील. याशिवाय कोणती लस तुम्ही घेऊ इच्छिता हा पर्यायही उपलब्ध होईल आणि ही लस संबंधित केंद्रांवर आहे की नाही याची माहिती मिळेल.

पोर्टलवर गोंधळ कायम

कोविन पोर्टलवर नोंदणी करताना अनेक प्रकारचा गोंधळ सामान्य नागरिक अनुभवत असून त्याबाबतच्या वाढत्या तक्रारी आरोग्य मंत्रालयाकडे येत आहेत. लसीकरणाचेही आकडे फुगवून सांगितले जात असल्याच्या दाव्याला पुष्टी देणाऱ्या या तक्रारी आहेत. अनेकांनी लस घेतल्यावर त्याबाबतचा संदेश आणि पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र मिळत नाही. दुसरीकडे ज्यांनी नोंदणी केली पण काही कारणाने ते प्रत्यक्ष लसीकरणाला जाऊ शकले नाहीत अशा नागरिकांनाही नोंदणीचे प्रमाणपत्र मोबाईलवर मिळाल्याचे प्रकार घडले आहेत. या तक्रारीनंतर आरोग्य मंत्रालयाने नोंदणी करतानाच ओटीपीसह काही तांत्रिक बदल केले आहेत.

Web Title: Citizens Now You Can Get The Vaccine You

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top