Srinivas BV : कोरोना संकटात ठरतोय देवदूत, परदेशातही चर्चा

Srinivas BV
Srinivas BV

नवी दिल्ली- कोरोना काळात लोक हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णांची (Corona Patients) संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य सुविधा तोकड्या पडल्या आहेत. अशा काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय. अशा लोकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी(Srinivas BV). कोरोना काळात ते लोकांची करत असलेली मदत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोना संकटाचा फायदा घेत अनेकजण राजकारण करत असताना श्रीनिवास यांनी माणूसकीचं दर्शन घडवलं आहे. अनेक लोकांसाठी ते देवदूत बनले आहेत. (Youth Congress President Srinivas BV helping corona patients in covid19 pandemic IYC)

कोण आहेत श्रीनिवास?

कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले श्रीनिवास यांचा राजकारणाशी दूर-दूरपर्यंत संबंध नव्हता. लहानपणी त्यांना क्रिकेटची आवड होती. ते कर्नाटकच्या अंडर-१६ टीमचा भागही राहिले आहेत. त्यांनी एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणूनही काम केलंय. क्रिकेटमध्ये यश न मिळाल्याने त्यांनी राजकारणाची वाट धरली. कॉलेजमध्ये असताना एनएसयूआय सदस्य म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि स्पष्ट विचारांमुळे सुरुवातीला ब्लॉक पातळीवर, त्यानंतर जिल्हा, राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर भारतीय युवा काँग्रेसचे एक सक्षम चेहरा ते बनले आहेत.

स्थानिक स्तरावर काम करण्याची आवड असलेले ४० वर्षीय श्रीनिवास यांची २०१४ मध्ये काँग्रेस युवा सचिव म्हणून नियुक्ती झाली, काही वर्षानंतर ते महासचिव झाले. २०१८ मध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना युवा काँग्रेस उपाध्यक्ष बनवलं होतं. २०२० मध्ये त्यांना युवा काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांच्या नेतृत्त्वात युवा काँग्रेसने केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांविरोधात आंदोलन केलंय.

Srinivas BV
तिसरी लाट मुलांसाठी घातक; कोरोना काळात घ्या 'ही' काळजी

कोरोना काळातील मदतीमुळे देशभर नाव

#SOSIYC हॅशटॅग ट्विटरवर दररोज ट्रेंड करत आहे. कोरोना संकटात सापडलेले अनेक भारतीय या हॅशटॅगचा वापर करत भारतीय युवा काँग्रेसला (IYC) मदतीसाठी हाक देत आहेत. IYC अध्यक्ष बी. वी. श्रीनीवास यांनी कोरोना काळात लोकांची सर्वप्रकारे मदत केलीये. दररोज जवळपास हजार लोक त्यांच्याकडे मदत मागत आहेत. लोकांना प्लाज्मा, ऑक्सिजन सिलिंडर, बेड्स मिळवून देण्याबरोबरच लोकांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, गरिबांसाठी जेवणाची सोय करणे अशी सर्व प्रकारची मदत श्रीनिवास यांच्या नेतृत्वातील युवा काँग्रेस करत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल-प्रियांका गांधी यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केलंय. ट्विटरवर मदत मागणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्रीनिवास यांची देशभरात चर्चा आहे.

Srinivas BV
लशीकरणानंतरही कोरोना होतो? केंद्र सरकारने दिलं उत्तर

सोनू सूदनेही केलंय कौतुक

कोरोना काळातील आपल्या मदतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदनेही त्यांचे कौतुक केलंय. मित्रा, असंच चांगलं काम करत रहा, असं तो म्हणाला. श्रीनिवास आपल्या कामाबद्दल बोलताना सांगतात की, आतापर्यंत जवळपास २ लाख लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना वेळेत ऑक्सिजन, बेड्स, प्लाझ्मा, ओषध मिळाली तर कोरोना रुग्णांचा मृत्यू होणार नाही.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच ते लोकांची मदत करत आहेत. जेव्हा फिलिपाईन्स आणि न्यूझीलंड दुतावासाने थेट श्रीनिवास टीमकडे मदत मागितली त्यावेळी सर्व देशाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. एका अभ्यासानुसार, श्रीनिवास यांना १ मार्च ते २४ एप्रिलपर्यंत मदतीसाठी 88,321 वेळा टॅग करण्यात आलंय. कोरोना संकट संपूर्ण मानवजातीवर घोंघावत असताना आपल्याला अशाच राजकीय नेत्यांची गरज असल्याची लोकांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com