आसामला संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत : राहुल गांधी

वृत्तसंस्था
Saturday, 28 December 2019

आसामला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत. आसामला फक्त आसाममधील जनताच चालवेल. भाजप ज्याठिकाणी जात आहे, तेथे द्वेषाचे राजकारण करत आहे.

गुवाहाटी : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना आम्ही आसाममधील इतिहास, भाषा, संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसाम नागपूरमधून चालू शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचा आज स्थापना दिन असून, देशभरात मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शहरांत याचे आयोजन करण्यात आले, यानिमित्त राहुल गांधी गुवाहाटीतील मार्चमध्ये सहभागी झाले होते. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील आणि प्रियांका गांधी लखनौमधील मार्चमध्ये सहभागी झाले होते.

चंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? : जयंत पाटील

राहुल गांधी म्हणाले, की आसामला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत. आसामला फक्त आसाममधील जनताच चालवेल. भाजप ज्याठिकाणी जात आहे, तेथे द्वेषाचे राजकारण करत आहे. आसामसह विविध राज्यांतील युवा आंदोलन करत आहेत. भाजप त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizenship Act Protests Rahul Gandhi Promises Residents to Not Let RSS Run State