चंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? : जयंत पाटील

राजेंद्रकृष्ण कापसे
Saturday, 28 December 2019

गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल.

पुणे : ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी मातोश्रीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. हे चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच माहिती असेल. आणि त्याच कल्पनेतून त्यांनी हे विधान केले असावे.' असा टोलाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्रीपदाच्या वाटपावर बोलताना म्हणाले होते, की राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद दिल्यास ‘मातोश्री’ बाहेर कॅमेरे लागतील. अशी टीका केली होती. त्यावर वरील प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी कोथरूड मध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाच्या उदघाटन पूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली.

दोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने

‘गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil targets Chandrakant Patil on home ministry portfolio in Pune