नितीश कुमार यांना झटका; जेडीयू'मध्ये दोन उभे गट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

  • नागरिकत्व संशोधन विधेयकास विरोध

पाटणा : नागरिकत्व संशोधन विधेयकास पाठिंबा देण्यावरून संयुक्त जनता दलामध्ये (जेडीयू) आता थेट दोन गट पडले आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी या विधेयकास पक्षाने पाठिंबा देणे, हे मूळ विचारधारा आणि राज्यघटनेविरोधात असल्याचे म्हटले आहे. देशाच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाचा तीन वेळा उल्लेख असून, हे विधेयक मात्र त्याविरोधात आहे. आमच्या पक्षाने कधीच या विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतली नव्हती, अशा भावना प्रशांतकिशोर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही याच मुद्द्यावरून नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीशकुमार हे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत जाऊन बसले असून, त्यांचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. नितीश यांनी भाजपसमोर सपशेल शरणागती पत्कारली आहे, अशी टीका त्यांनी केली. 

धक्कादायक : गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची काढली धिंड; विद्यार्थीनींचाही समावेश

"जेडीयू'चे सरचिटणीस पवन वर्मा यांनीही या विधेयकाच्या विरोधातच सूर आळवला आहे. या विधेयकास राज्यसभेमध्ये पाठिंबा देण्याबाबत नितीशकुमार यांनी फेरविचार करावा. हे विधेयक घटनाविरोधी असून, देशाचा सौहार्द आणि ऐक्‍यालाही त्याचा धोका असल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizenship Amendment Bill sparks rift in JDU