धक्कादायक ! कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची काढली धिंड; विद्यार्थीनींचाही समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

  • विद्यार्थ्यांना काळे फासून शाळेत काढली धिंड
  • परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षा

हिसार (हरियाना) : परीक्षेचे ओझे न बाळगता "हसत-खेळत' शिक्षण हा विद्यार्थ्यांचा अधिकार असताना हिसारमधील एका खासगी शाळेत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने सहावीच्या चार विद्यार्थ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्यांची शाळेत धिंड काढण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही अपमानास्पद घटना शुक्रवारी (ता. 6) घडली. ज्या चार मुलांना काळे फासण्यात आले, त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यातील एका मागास मुलीने याबाबत पालकांना सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. तिच्या पालकांनी मंगळवारी पत्रकारांना याची माहिती दिली. मुलांना अशा प्रकारची वागणूक दिल्याची तक्रार करण्यास पालक शाळेत गेले होते. मात्र, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थतता दर्शविली. संबंधित मुलीच्या कुटुंबासह अन्य पालकांनी काल पोलिस स्थानकाबाहेर आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ही माहिती मिळताच काही मागास संघटनाचे कार्यकर्तेही तेथे पोचले.

खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकारी काल शाळेत गेले होते, पण तेथे टाळे लावलेले होते. शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे कुटुंबही घरी आढळले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Blackens Faces of 4 Students in Haryana for Poor Performance in Test