शाह फैजल नजरकैदेत; दिल्ली विमानतळावरून पाठविले परत

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

शाह फैजल हे परदेशात जाण्यासाठी दिल्लीला आले होते. मात्र, विमानतळावर त्यांना रोखण्यात आले आणि पुन्हा काश्मीरला पाठविण्यात आले. 2009 मध्ये आयएएस परीक्षेत टॉप केल्यानंतर शाह फैजल हे सर्वांसमोर आले होते.

श्रीनगर : माजी आयएएस अधिकारी व राजकीय नेते डॉ. शाह फैजल यांना दिल्ली विमातळावरून पुन्हा काश्मीरला पाठविण्यात  आले आहे. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहे. काश्मीरमधील नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. आता केंद्र सरकारने आयएएस नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या शाह फैजल यांनाही नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाह फैजल हे परदेशात जाण्यासाठी दिल्लीला आले होते. मात्र, विमानतळावर त्यांना रोखण्यात आले आणि पुन्हा काश्मीरला पाठविण्यात आले. 2009 मध्ये आयएएस परीक्षेत टॉप केल्यानंतर शाह फैजल हे सर्वांसमोर आले होते. काश्मीरमध्ये होत असलेल्या हिसांचाराबद्दल आणि भारतीय मुस्लिमांबद्दल मत व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civil servant turned politician Shah Faesal under house arrest