तंबाखू खाणाऱ्या रुग्ण, नातेवाईकांना आता बंदुकधारींचाच धाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Civil Surgeon Advise patients and relatives who consume tobacco bhopal

तंबाखू खाणाऱ्या रुग्ण, नातेवाईकांना आता बंदुकधारींचाच धाक

भोपाळ : पान, तंबाखू खाऊन रुग्णालयाच्या आवारात थुंकणाऱ्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांना लगाम घालण्यासाठी मध्य प्रदेशातील सिव्हिल सर्जनने बडगा दाखवला. बंदूक तसेच काठ्या घेतलेल्या सुरक्षा रक्षकांच्या साथीत त्यांनी रुग्ण तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांची झडतीच घेतली.

डॉ. जी. एस. परिहार असे त्यांचे नाव असून ते शाहडोल जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आहेत. त्यांच्या कृतीची चित्रफीत व्हायरल होताच सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिसाद उमटले. चित्रफीत व्हायरल होताच त्यात आपण दिसत असल्याचे डॉ. परिहार यांनी स्पष्ट केले. काही जणांनी हे कृत्य अमानवी असल्याची टीका केली, तर काही जणांनी कौतुक केले. डॉ. परिहार म्हणाले की, रुग्णांना तंबाखू खाण्यापासून तसेच थुंकण्यापासून रोखण्यासाठीच हा उपाय केला.

Web Title: Civil Surgeon Advise Patients And Relatives Who Consume Tobacco Bhopal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bhopaltobaccoDesh news
go to top