Bhushan Gavai : सुटीकाळात वकिलांनाच काम करायचे नसते; सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायपालिकेला जबाबदार धरणे चुकीचे
Supreme Court India : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुटीच्या काळात वकिलांना काम करायचे नसते, पण न्यायालयावर खटले प्रलंबित राहिल्याची जबाबदारी टाकली जाते, असा टोला लगावला.सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात वकिलाच्या सुटीच्या मागणीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली, ता.२१ (पीटीआय) ः वकिलांना सुटीच्या काळात काम करायचे नसते, पण खटले प्रलंबित राहिल्याबद्दल मात्र न्यायपालिकेला जबाबदार धरले जाते, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुधवारी व्यक्त केले.