
श्रीनगर: ‘‘जाणीवेशिवाय मिळालेले हक्क हे निरुपयोगी ठरतात,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी काश्मीरमध्ये केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या उत्तर विभागाच्या(एनएएलएसए) वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये ते बोलत होते. नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.